Lokmat Money > बिझनेस न्यूज > Fuel Price Hike: तयार राहा, भडका उडणार! पेट्रोलचे दर १२ ते १७ रुपयांनी वाढवू द्या; कंपनीची केंद्राकडे मागणी 

Fuel Price Hike: तयार राहा, भडका उडणार! पेट्रोलचे दर १२ ते १७ रुपयांनी वाढवू द्या; कंपनीची केंद्राकडे मागणी 

Petrol, Diesel Price Hike: रशिया-युक्रेन यांच्यातील तणावामुळे खनिज तेलाच्या वाढलेल्या किमतीच्या झळा आता देशवासीयांना बसण्यास सुरुवात होणार आहे. पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया संपली असल्याने इंधनाचे दर उसळी घेण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर खाद्यपदार्थांच्या किमतीही वाढणार आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 06:34 AM2022-03-09T06:34:03+5:302022-03-09T06:34:49+5:30

Petrol, Diesel Price Hike: रशिया-युक्रेन यांच्यातील तणावामुळे खनिज तेलाच्या वाढलेल्या किमतीच्या झळा आता देशवासीयांना बसण्यास सुरुवात होणार आहे. पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया संपली असल्याने इंधनाचे दर उसळी घेण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर खाद्यपदार्थांच्या किमतीही वाढणार आहेत. 

Get ready, inflation will explode! Let petrol price be increased by 12 to 17 rupees; Demand of the IOCL to the Center | Fuel Price Hike: तयार राहा, भडका उडणार! पेट्रोलचे दर १२ ते १७ रुपयांनी वाढवू द्या; कंपनीची केंद्राकडे मागणी 

Fuel Price Hike: तयार राहा, भडका उडणार! पेट्रोलचे दर १२ ते १७ रुपयांनी वाढवू द्या; कंपनीची केंद्राकडे मागणी 

शीलेश शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया संपुष्टात येताच तेल उत्पादक कंपन्यांनी इंधन दरात वाढ करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. इंडियन ऑइल कंपनीने याबाबत पुढाकार घेतला असून पेट्रोल दरांत १२ ते १७ रुपये वाढ करण्यात यावी, अशी शिफारस केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाला केली आहे. 

रशिया-युक्रेनमधील तणावामुळे जागतिक बाजारात कच्चे तेल महागले आहे. किमती आंतरराष्ट्रीय बाजारात १३० डॉलर प्रतिबॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत. देशांतर्गत तेल कंपन्यांना ही बाब ध्यानात घेऊन इंधनदरांचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मंगळवारी स्पष्ट केले. 

नागपुरात सीएनजी १२० रुपये किलो
नागपूर : पाच राज्यांतील निवडणुका संपताच नागपुरात सीएनजीच्या किमतीत तब्बल २० टक्के वाढ होऊन दर १२० रुपयांवर पोहोचले आहेत. नागपुरात सीएनजी देशात सर्वाधिक महाग असून, त्याची किंमत पेट्रोल व डिझेलपेक्षाही जास्त आहे. वर्षभरापासून नागपुरात सीएनजीचे दर १०१ रुपये किलो होते. 

कच्च्या तेलाची गरज, पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजाराचा कल यांच्या आधारावर इंधनाचे दर ठरत असतात. राखीव साठा सुरक्षित ठेवण्यासाठी कच्च्या तेलाची खरेदी ही निरंतर प्रक्रिया आहे. दरवाढीचा निर्णय घेताना याचा विचार केला जातो. 
    - आर. एस. बुटोला, इंडियन 
    ऑइलचे माजी अध्यक्ष

Web Title: Get ready, inflation will explode! Let petrol price be increased by 12 to 17 rupees; Demand of the IOCL to the Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.