Join us  

नकाेशा काॅल्सपासून सुटका; १ मेपासून कंपन्या करणार महत्त्वाचे बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 11:29 AM

कंपन्या वापरणार एआय फिल्टर, १ मेपासून महत्त्वाचे बदल

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : माेबाइलवर येणारे नकाेसे काॅल्स आणि एसएमएसमुळे त्रस्त झालेल्या काेट्यवधी ग्राहकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरण असे काॅल्स ब्लाॅक करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार आहे. ही यंत्रणा तुमच्या फाेनपर्यंत असे काॅल्स येऊच देणार नाही. नेटवर्कवरच काॅल्स फिल्टर हाेतील. १ मेपासून काही बदल हाेणार आहेत.

प्राप्त माहितीनुसार, दूरसंचार विभागाने दिलेल्या निर्देशानुसार माेबाइल कंपन्या ‘एआय’वर आधारित स्पॅम फिल्टर लावणार आहे. याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नेटवर्क पातळीवरच नकाे असलेले काॅल्स ब्लाॅक हाेतील. सर्वसामान्यांच्या माेबाइलवर असे काॅल्स येणारच नाहीत. याशिवाय एसएमएससंदर्भातही अशाच प्रकारची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. फसवणूक करणाऱ्या लिंक असलेले एसएमएसदेखील माेबाइलवर पाेहाेचणारच नाहीत. 

कशी काम करेल यंत्रणा?n या सेवेसाठी माेबाइल कंपन्यांना काॅमन यंत्रणेचा वापर करावा लागेल. n विविध नेटवर्कवरून येणारे स्पॅम काॅल्स ब्लाॅक करण्यासाठी या यंत्रणेची मदत घेणार आहेत. n कंपन्यांना ब्लाॅक केलेल्या क्रमांकांची माहिती या यंत्रणेद्वारे कळवावी लागेल.

बॅंक, आधारसाठी वेगळे क्रमांकn ग्राहकांना बॅंकिंग सेवा, आधार व इतर अत्यावश्यक सेवांसाठी माेबाइल क्रमांक द्यावा लागताे. n या सेवा पुरविणाऱ्यांना वेगळ्या मालिकेतील क्रमांक देण्यात येतील. n मालिका वेगळी असल्यामुळे हे क्रमांक ब्लाॅक हाेणार नाहीत.

माेबाइल ग्राहकांना दरराेज ३-४ स्पॅम काॅल्स अर्थात नकाे असलेले किंवा टेलिमार्केटिंगचे काॅल्स येतात.

सेबीचा  दणका१ मेपासून हाेणाऱ्या दाेन प्रमुख बदलांमध्ये सेबीने ब्राेकर्ससंदर्भात दिलेल्या आदेशाचा समावेश आहे. स्टाॅक ब्राेकर्स व क्लिअरिंग मेंबर्सने ग्राहकांचे पैसे बॅंकांमध्ये गहाण ठेवण्यावर सेबीने बंदी घातली आहे. याचा ब्राेकर्सला दुहेरी फायदा हाेताे. मात्र, ग्राहकांची गुंतवणूक धाेक्यात येते.

जीएसटी संबंधित नियमही बदलणार१०० काेटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना ७ दिवसांत पावत्या नव्या पाेर्टलवर अपलाेड कराव्या लागतील. अन्यथा रिटर्न मिळणार नाही. 

ग्राहकांना दरराेज किमान एक काॅल येताे. 

टॅग्स :मोबाइलस्मार्टफोन