Join us

...असा पैसा मिळवा अन् उतारवयात मस्त जगा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 6:08 AM

त्यातून तुमचा खर्च आणि बचत याचे योग्य संतुलन ठेवले जाते.

वृद्धापकाळात अनेकांची ससेहोलपट झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. यामागील एक प्रमुख कारण म्हणजे आर्थिक अस्थिरता. याेग्य नियाेजन न केल्यास अशी स्थिती निर्माण हाेते. त्यामुळे आपला वृद्धापकाळ आरामदायक जावा, असे वाटत असेल, तर ५०-३०-२० या नियमाचे पालन उपयुक्त ठरू शकते. सिनेटर एलिझाबेथ वॉरेन यांनी आपल्या ‘ऑल युअर वर्थ : द अल्टिमेट लाइफटाइम मनी प्लॅन’ या पुस्तकात हा नियम सांगितला आहे. त्यानुसार कर भरल्यानंतर जे उत्पन्न तुमच्या हातात राहते, त्याचे ३ भाग केले जातात. त्यातून तुमचा खर्च आणि बचत याचे योग्य संतुलन ठेवले जाते.

इन्फोग्राफिक्स

...या गोष्टी लक्षात ठेवाnतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच बचत करा.nआरोग्य विमा, अपघात विमा अवश्य खरेदी करा.nआपल्या पश्चात परिवाराची सुरक्षा व्हावी, यासाठी टर्म विमा खरेदी करा.nउत्तम पेन्शन योजनेत गुंतवणूक करा. त्यातून तुमच्या वृद्धापकाळातील चिंता दूर होतील.

चैन आणि गरजेत  फरक हवाचैन आणि आवश्यक खर्च यात फरक अवश्य असू द्या. त्यांची गल्लत करू नका.  कर्जाचा हप्ता कमाईतील ३० टक्क्यांपेक्षा कदापि जास्त होऊ देऊ नका.

काय आहे नियम?

५०-३०-२० नियमानुसार, प्रत्येकाच्या उत्पन्नातील हिस्सा आवश्यकखर्चासाठी ठेवावा. हिस्सा सुखविलासावर खर्च करावा.  हिस्सा बचतीसाठी वापरावा.

 

...असे समजून घ्या गणित

समजा तुमची मासिक कमाई ५० हजार रुपये आहे.५०-३०-२० नियमानुसार

२०% म्हणजेच १० हजार रुपये बचतीसाठी वापरावेत.

३०%म्हणजेच १५ हजार रुपये बाहेर जेवायला जाणे, कार आणि नवीन गॅझेट यांसारख्या चैनीसाठी खर्च करावेत. 

५०%म्हणजेच २५ हजार रुपये गृहकर्जाचा हप्ता, मुलांची फी, किराणा आणि आरोग्य विमा अशा आवश्यक गरजांवर खर्च करावेत.

 

 

टॅग्स :पैसानिवृत्ती वेतन