Lokmat Money > बिझनेस न्यूज > जिओ समर सरप्राइज ऑफर, असा मिळवा 100 जीबी 4G डेटा फ्री

जिओ समर सरप्राइज ऑफर, असा मिळवा 100 जीबी 4G डेटा फ्री

भारतीय दूरसंचार क्षेत्रात धमाल उडवून देणारी कंपनी रिलायन्स जिओची आणखी एक धमाकेदार ऑफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2017 01:23 PM2017-04-05T13:23:35+5:302017-04-05T13:23:35+5:30

भारतीय दूरसंचार क्षेत्रात धमाल उडवून देणारी कंपनी रिलायन्स जिओची आणखी एक धमाकेदार ऑफर

Get the Zoe Summer Surprise Offer, get 100 GB 4G data free | जिओ समर सरप्राइज ऑफर, असा मिळवा 100 जीबी 4G डेटा फ्री

जिओ समर सरप्राइज ऑफर, असा मिळवा 100 जीबी 4G डेटा फ्री

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - भारतीय दूरसंचार क्षेत्रात धमाल उडवून देणारी कंपनी रिलायन्स जिओने आणखी एक धमाकेदार ऑफर आणली आहे.  ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी  समर सरप्राइज ऑफर आणली आहे. ही ऑफर इतर ऑफरप्रमाणे मोफत नसून यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत.  
 
जर तुम्ही 999 रुपयांचं रिचार्ज केल्यास तुम्हाला 100 जीबी  4G डेटा मोफत मिळणार आहे. जिओ प्राइम मेंबरने 999 रुपयाचं रिचार्ज केल्यानंतर त्याला 60 दिवसांसाठी मोफत कॉलिंगसह 60 जीबी डेटा मिळणार होता पण समर सरप्राइज ऑफरमध्ये कंपनी ग्राहकांना 3 महिन्यासाठी 100 जीबी  4G  डेटा देणार आहे. यामध्ये दिवसाला कोणात्याही लिमिटशिवाय 100 जीबी डेटा वापरता येणार आहे. सरप्राइज ऑफरनुसार मिळालेला हा डेटा 30 जूनपर्यंत वापरता येणार आहे. त्यानंतरही 31 ऑगस्टपर्यंत रिचार्ज करायची गरज नाही, कारण 1 जुलैपासून 31 ऑगस्टपर्यंत 60 जीबी 4Gडेटा मिळणार आहे. 
 
यापुर्वी  प्राइम मेंबरशीप घेतलेल्या ग्राहकांना समर सरप्राइज ऑफरमध्ये 303 आणि 499 रुपयाचं एकदा रिचार्ज केल्यास तीन महिन्यापर्यंत सेवा मोफत मिळणार आहे. 
रिलायन्स जिओ इंटरनेट स्पीडमध्येही नंबर वन - ट्राय
इंटरनेट स्पीडच्याबाबतीत रिलायन्स जिओने इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांना खूप मागे टाकलं आहे. याबाबतीत रिलायन्स जिओ पहिल्या क्रमांकावर असल्याचं दूरसंचार नियामक म्हणजे ट्रायने म्हटलं आहे.  ट्रायच्या डेटानुसार इंटरनेट स्पीडच्याबाबतीत रिलायन्स जिओ पहिल्या क्रमांकावर आहे. 
 
रिलायन्स जिओचा डेटा डाऊनलोड स्पीड इतर प्रतिस्पर्धी कंपन्या आयडिया सेल्यूलर आणि एअरटेलपेक्षा दुप्पट झाला असल्याचं ट्रायने म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यात जिओ नेटवर्क सर्वात वेगवान ठरलं आहे. जिओ नेटवर्कचा फेब्रुवारी महिन्यातील इंटरनेट स्पीड 16.48 एमबीपीएस होता. पण जानेवारीच्या तुलनेत हा स्पीड कमी झाला आहे. जानेवारीत जिओचा स्पीड 17.42 mbps एमबीपीएस होता. 
 
जिओचे प्रतिस्पर्धी आयडिया सेल्युलर 8.33 एमबीपीएस दुसऱ्या स्थानावर आणि एअरटेल 7.66 एमबीपीएस तिसऱ्या स्थानावर आहे. तर वोडाफोनचा स्पीड 5.66 एमबीपीएस आहे. तर बीएसएनएलचा 2.89 एमबीपीएस आहे. ट्रायच्या डेटानुसार, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सरासरी डाऊनलोड स्पीड रिलायन्स कम्युनिकेशन्ससाठी 2.67 एमबीपीएस तर टाटा डोकोमोसाठी 2.67 एमबीपीएस तर एअरसेलसाठी 2.01 एमबीपीएस आहे. इतर नेटवर्कसाठी सरासरी डाऊनलोड स्पीड उपलब्ध नाही.
 
यापुर्वी एअरटेलने सर्वात वेगवान इंटरनेट आमचं असल्याचा दावा एअरटेलने केला होता. 

Web Title: Get the Zoe Summer Surprise Offer, get 100 GB 4G data free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.