वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने नवे आदेश जारी करून एच-१बी आणि एल१ हे व्हिसा मिळणे कठीण करून टाकले. यामुळे रोजगारासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीयांच्या अडचणीत भरच पडणार आहे.
अमेरिकी सिटिझन्स इमिग्रेशन सर्व्हिसेस विभागाने १३ वर्षे जुन्या व्हिसा धोरणाची पुनर्रचना केली आहे. पात्रता सिद्ध करण्यासाठी पुराव्याची जबाबदारी कायमस्वरूपी व्हिसासाठी अर्ज करणा-यांवरच राहील, असा नवा नियम करण्यात आला आहे. व्हिसाला मुदतवाढ घ्यायची असली तरी हा नियम लागू राहील. हा आदेश २३ आॅक्टोबर रोजी यूएससीआयएसने जारी केला आहे. या आदेशात म्हटले आहे की, नॉन-इमिग्रंट दर्जाच्या व्हिसाच्या मुदतवाढीसाठी पुराव्यांची जबाबदारी अर्जदारांवर राहील. आतापर्यंत २३ एप्रिल २००४ रोजीच्या आदेशाचे नियम व्हिसासाठी लावले जात होते. या नियमांत व्हिसा मुदतवाढीच्या वेळी पात्रताविषयक पुराव्याची जबाबदारी फेडरल एजन्सीवर होती.
नवे आदेश जारी झाल्यानं अमेरिकी व्हिसा मिळणे अधिक अवघड
वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने नवे आदेश जारी करून एच-१बी आणि एल१ हे व्हिसा मिळणे कठीण करून टाकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 04:07 AM2017-10-27T04:07:58+5:302017-10-27T04:08:03+5:30