भारतीय संस्कृतीत दान किवा दान वाला खूप महत्त्व आहे. लग्न असो किवा मुलाचा जन्म असो, नातेवाईक खूप भेटवस्तू देतात. लोक जीवंत असताना मृत्यूपत्र करून काही गोष्टी दुसऱ्याच्या नावे करत असतात. भेट म्हणून कुणाला नेमके काय देता येते. त्याची किंमत किती असावी, एखादी मालमत्ता किंवा जमीन भेट म्हणून देता येते का, यावर काही कर आकारला जातो का है समजून घेणे महत्त्वाचे आहे.
नेमके काय आहेत नियम?
पूर्णपणे ऐच्छिक, कोणताही मोबदला नाही
भेट म्हणजे अस्तित्वात असलेल्या जंगम किंवा स्थावर मालमत्तेचे हस्तांतरण, हे ऐच्छिक असते. देत असलेली भेट पूर्णपणे मोफत आहे. त्या बदल्यात तुम्हाला कोणतेही बक्षीस मिळणार नसते.
भेटवस्तू न स्वीकारल्यास करार अवैध
या प्रक्रियेत देणारी व्यक्ती दाता तर स्वीकारणारी प्राप्तकर्ता असते. हा करार करण्यासाठी देणगीदार सक्षम व्यक्ती असणे आवश्यक आहे. भेटवस्तू प्राप्तकत्याने स्वीकारली नाही तर ती अवैध मानली जाते.
दान देताच तत्काळ बदलतो मालकी हक्क
वस्तू किंवा जंगम मालमत्ता दान करताच तिची मालकी बदलते, त्यात जंगम किंवा स्थावर मालमत्तेचा समावेश असू शकतो. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत गिफ्ट डीडची नोंदणी अनिवार्य असते.
भेटवस्तूंवर किती द्यावा लागतो कर?
पालक, आजी-आजोबा, भाऊ आणि बहिणींकडून एखाद्याला मिळालेल्या भेटवस्तू करमुक्त असतात. त्याचप्रमाणे लग्नादरम्यान मिळालेल्या भेटवस्तूही करमुक्त असतात. कोणतीही व्यक्त्ती एका वर्षात केवळ ५० हजार रुपयांपर्यंतच्या भेटवस्तू करमुक्त घेऊ शकते. त्यानंतर मात्र टॅक्स स्लॅबनुसार त्यावर कर आकारला जातो.
इच्छापत्राच्या पूर्ततेची जबाबदारी कुणावर?
आपचारिक कायदेशीर दस्तऐवज आहे. यात व्यक्त्ती मृत्यूनंतर मालमत्तेच्या वाटपासंदर्भातील इच्छांची रूपरेषा दर्शवते. ती व्यक्ती एक एक्झिक्युटर नामांकित करते. इच्छापत्राच्या पूर्ततेची जबाबदारी एक्झिक्युटरवर असते.
मृत्यूनंतरच लाभार्थ्यांकडे संपत्ती हस्तांतरित केली जाते. मृत्युपत्र करणारी व्यक्ती मृत्यूपूर्वी ते रद्द करू शकते वा त्यात बदल करू शकते. मृत्युपत्र करणारा त्याची संपूर्ण मालमत्ता किंवा मालमत्तेचा काही भाग कुटुंबातील किंवा कुटुंबाबाहेरील कोणालाही देऊ शकतो.