Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुलींनो, आधी जॉब, मग लग्न, ७५ टक्के तरुण-तरुणींचे मत; नवा ट्रेंड देशामध्ये होऊ लागला सेट

मुलींनो, आधी जॉब, मग लग्न, ७५ टक्के तरुण-तरुणींचे मत; नवा ट्रेंड देशामध्ये होऊ लागला सेट

या अहवालासाठी देशातील १८ ते २९ या वयोगटातील २४ हजारहून अधिक तरुण-तरुणींची मते जाणून घेण्यात आली. यात ६४ टक्के तरुण तर ३६ टक्के तरुणींचा समावेश करण्यात आला होता. सहभागी झालेल्यांपैकी ६६ टक्के तरुण-तरुणी ग्रामीण भागातील होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 07:27 AM2024-02-22T07:27:31+5:302024-02-22T07:27:47+5:30

या अहवालासाठी देशातील १८ ते २९ या वयोगटातील २४ हजारहून अधिक तरुण-तरुणींची मते जाणून घेण्यात आली. यात ६४ टक्के तरुण तर ३६ टक्के तरुणींचा समावेश करण्यात आला होता. सहभागी झालेल्यांपैकी ६६ टक्के तरुण-तरुणी ग्रामीण भागातील होत्या.

Girls, job first, marriage later, 75 percent of youth vote; A new trend started to set in the country | मुलींनो, आधी जॉब, मग लग्न, ७५ टक्के तरुण-तरुणींचे मत; नवा ट्रेंड देशामध्ये होऊ लागला सेट

मुलींनो, आधी जॉब, मग लग्न, ७५ टक्के तरुण-तरुणींचे मत; नवा ट्रेंड देशामध्ये होऊ लागला सेट

गणेश देवकर

नवी दिल्ली : शिक्षण पूर्ण केल्यानंतर विवाह करून सेटल होण्यापेक्षा मुलींनी नोकरी केली पाहिजे, असे मत जवळपास ७५ टक्के तरुण-तरुणींनी मांडले आहे. शिक्षणानंतर प्रथम विवाहाला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत केवळ १६ टक्के जणांनी नोंदविले आहे. युनिसेफचे तरुणांचे व्यासपीठ असलेले ‘युवाह’ आणि ‘यू-रिपोर्ट’मधून ही बाब समोर आली आहे.

या अहवालासाठी देशातील १८ ते २९ या वयोगटातील २४ हजारहून अधिक तरुण-तरुणींची मते जाणून घेण्यात आली. यात ६४ टक्के तरुण तर ३६ टक्के तरुणींचा समावेश करण्यात आला होता. सहभागी झालेल्यांपैकी ६६ टक्के तरुण-तरुणी ग्रामीण भागातील होत्या.

शिक्षणानंतर मुलींनी काय करावे?

सहभागी म्हणाले की, शिक्षणानंतर नोकरीस प्राधान्य दिले पाहिजे. यात ६९ टक्के तरुणी तर ८४ टक्के तरुणांचा समावेश होता.

जणांनी सांगितले की शिक्षणानंतर मुलींच्या विवाहाला प्राधान्य दिले पाहिजे. यात तरुणांचे प्रमाण २४ टक्के इतके होते तर मुलींचे प्रमाण केवळ १२ टक्के होते.

जणांना यावर मत मांडला आले नाही.

जणांनी सांगितले की शिक्षणानंतर मुलींच्या विवाहात अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे नोकरीपेक्षा विवाह महत्त्वाचा आहे.

जण म्हणाले, लग्नानंतरही नोकरी मिळू शकते.

जणांनी मुलींनी विवाह करून सेटल व्हावे, असे मत नोंदविले.

नोकरी कशी हवी?

४३% जणांनी मुलांच्या जन्मानंतरही महिला नोकरी करू शकतात. मुलांना सांभाळण्याची सुविधा, सोयीच्या वेळा असल्यास महिलांना हे शक्य आहे, असे त्यांना वाटते.

४९% सहभागी म्हणाले की, तरुणींना नोकरीच्या ठिकाणी धोरणांमध्ये लवचिकता हवी असते.

५५% म्हणाले की, घरगुती कामे करता येणे शक्य असल्याने महिला वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देतात.

करिअर कशात? निर्णय कुणाचा?

५६%तरुणांनी सांगितले की, महिलांनी करिअरसाठी कोणते क्षेत्र निवडावे याचा निर्णय पालक तसेच कुटुंबीय घेतात. ३३ टक्के तरुण व ३७ टक्के तरुणीनी सांगितले की, करिअर कशात करायचे हा निर्णय स्वत: घेतला पाहिजे.

Web Title: Girls, job first, marriage later, 75 percent of youth vote; A new trend started to set in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी