भुवनेश्वर : गीतांजली इन्फ्राटेक लि. समूहाचा जेम्स, ज्वेलरी, लाइफ स्टाईल व लक्झरी वस्तूंचा पार्क ओडिशा सरकारने रद्द केला आहे. ६३६ कोटी रुपये खर्चून हा पार्क उभा केला जाणार होता. पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या मेहूल चोकसी याच्या मालकीची ही कंपनी आहे. पीएनबी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीचा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय ओडिशा सरकारने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. बासनातच गुंडाळलाओडिशाचे उद्योग विभागाचे प्रधान सचिव संजीव चोप्रा यांनी सांगितले की, ही कंपनी संकटात आहे, असे दिसते. आम्हाला बोलता येईल, असे येथे कोणीही दिसत नाही. अशा परिस्थितीत प्रकल्प उभा राहू शकत नाही. त्यामुळे हा प्रकल्प आम्ही बासनात गुंडाळला आहे. हा प्रकल्प १०० एकरवर उभा राहणार होता. रामदासपूर येथे ३० एकर जमीन कंपनीला देण्यातही आली होती.
गीतांजली समूहाचे ज्वेलरी पार्क रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 1:10 AM