Join us  

'Adani Groupच्या तपासासाठी आणखी १५ दिवस द्या,' SEBIनं सर्वोच्च न्यायालयाकडे मागितली मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 3:09 PM

अदानी समूहाच्या २४ व्यवहारांची चौकशी करत असून त्यापैकी १७ व्यवहारांची चौकशी पूर्ण झाल्याचं सेबीनं म्हटलंय.

Adani Group News: बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) आज सर्वोच्च न्यायालयातअदानी समूहाच्या चौकशीशी संबंधित अहवाल सादर करणार होते. मात्र, सुरू असलेला तपास अद्यापही पूर्ण झाला नसल्याची बाब आता समोर आली असून सेबीने तपास पूर्ण करण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदत मागितली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, आजच्या कायदेशीर फाइलिंगवरून ही बाब समोर आली आहे. अदानी समूहाच्या २४ व्यवहारांची चौकशी करत असून त्यापैकी १७ व्यवहारांची चौकशी पूर्ण झाली आहे. याशिवाय पुढील कारवाईसाठी इतर नियामक आणि परदेशी संस्थांकडून माहिती मागवली असल्याचं सेबीनं म्हटलंय.

तीन वर्षांपासून तपासऑक्टोबर २०२० मध्ये, सेबीनं अदानी समूहाच्या पोर्ट्स, पॉवर आणि इन्फ्रा व्यवसायातील परदेशी गुंतवणुकीची तपासणी सुरू केली. अदानी समूहानं परदेशी कंपन्यांचा वापर आपल्या व्यवसायात केला आणि त्याला खुलासा केला का हा या तपासाचा विषय होता. अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्गने या वर्षी जानेवारीतही असेच आरोप केले होते, ज्याची सुमारे अडीच वर्षे सेबीकडून चौकशी सुरू होती. सेबीनं ऑक्टोबर २०२० पासून तपास सुरू केला आणि हिंडेनबर्गनं जानेवारी २०२३ मध्ये आपला अहवाल सादर केला. हिंडेनबर्गच्या आरोपानंतर, तपास जलद करण्यासाठी सेबीवर दबाव वाढला. दरम्यान, हिंडेनबर्गच्या आरोपांचं अदानी समूहाकडून खंडन करण्यात आलं होतं.

शेअर्स आपटलेअदानी समूहाच्या शेअर्सवर आज खूप दबाव आहे. कंपनीच्या लिस्टेट १० शेअर्सपैकी एकाही शेअर मध्ये आज वाढ दिसून आली नाही. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस आणि अंबुजा सिमेंट्स यांसारख्या काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये इंट्रा-डेमध्ये ४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली यावरून त्याच्या शेअर्समध्ये किती मोठी घसरण झाली याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

टॅग्स :गौतम अदानीअदानीसेबीसर्वोच्च न्यायालय