नवी दिल्ली : सेवानिवृत्ती वेतनाच्या (पेन्शन) तपशिलाचा संबंध हा ज्येष्ठांशी असल्याने त्यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेला तपशील ४८ तासांत उपलब्ध करून द्यावा व अशा तक्रारींचे निराकरण लवकर करावे, असे केंद्रीय माहिती आयोगाचे म्हटले आहे. निवृत्तांनी माहिती अधिकारात केलेली तक्रार अस्सल असेल तर तिचे निराकरण होण्यासाठी ४८ तासांत पावले उचलली गेली पाहिजेत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. एका महिलेने तिला मिळणाऱ्या पेन्शनच्या विसंगतीबद्दलचा तपशील माहिती अधिकारात मागितला होता. त्यानिमित्ताने माहिती आयुक्त श्रीधर आचार्युलू यांनी दिलेल्या आदेशाचा लाभ आता केंद्र सरकारमधील ५८ लाख सेवानिवृत्तीधारकांना होणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पेन्शनरांना ४८ तासांत माहिती द्या - सीआयसी
By admin | Published: April 03, 2017 4:40 AM