Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'तुम हमें खून दो, हम तुम्हें JIO सिम देंगे'

'तुम हमें खून दो, हम तुम्हें JIO सिम देंगे'

रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान मानलं जातं. गरजू व्यक्तींसाठी रक्तदान म्हणजे जीवनदानापेक्षा कमी नसतं. स्वेच्छेने रक्तदान करणा-यांची संख्याही काही कमी नाही. मात्र, उत्तरप्रदेशच्या

By admin | Published: September 27, 2016 07:08 PM2016-09-27T19:08:48+5:302016-09-27T19:08:48+5:30

रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान मानलं जातं. गरजू व्यक्तींसाठी रक्तदान म्हणजे जीवनदानापेक्षा कमी नसतं. स्वेच्छेने रक्तदान करणा-यांची संख्याही काही कमी नाही. मात्र, उत्तरप्रदेशच्या

'Give us blood, we will give you JIO SIM' | 'तुम हमें खून दो, हम तुम्हें JIO सिम देंगे'

'तुम हमें खून दो, हम तुम्हें JIO सिम देंगे'

ऑनलाइन लोकमत

गाजियाबाद, दि. 27- रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान मानलं जातं. गरजू व्यक्तींसाठी रक्तदान म्हणजे जीवनदानापेक्षा कमी नसतं. स्वेच्छेने रक्तदान करणा-यांची संख्याही काही कमी नाही. मात्र, उत्तरप्रदेशच्या गाजियाबादमधील रोटरी क्लबने रक्तदानासाठी लोकांना प्रेरित करण्यासाठी एक अनोखी ऑफर ठेवली.
 
'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, गाजियाबादमधील नवयुग मार्केटमध्ये रविवारी रक्तदान शिबीर भरवण्यात आलं होतं. यामध्ये रक्तदान करणा-यांना जिओ सिमकार्ड मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
 
या ऑफरविषयी नागरिकांना समजल्यावर रक्तदान करणा-यांची एकच झुंबड उडाली. रक्तदान करायला येणा-यांना आधार कार्ड, 4जी फोन आणि स्वतःचा फोटो सोबत घेऊन येण्यास सांगण्यात आलं होतं. शिबीरामध्ये सिमकार्ड देणा-या कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते आणि सिमकार्ड अॅक्टिवेट करून देत होते.
 

Web Title: 'Give us blood, we will give you JIO SIM'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.