Lokmat Money > बिझनेस न्यूज > वाहिनीवर शेअर्सच्या टिप्स देणं पडलं महागात, सेबीनं एक्सपर्ट्स आणि फर्म्सवर केली मोठी कारवाई

वाहिनीवर शेअर्सच्या टिप्स देणं पडलं महागात, सेबीनं एक्सपर्ट्स आणि फर्म्सवर केली मोठी कारवाई

सेबीनं एक्सपर्ट्स आणि फर्म्सना ठोठावला ७.४१ कोटींचा दंड, पाहा नक्की काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 10:50 AM2024-02-09T10:50:40+5:302024-02-09T10:51:24+5:30

सेबीनं एक्सपर्ट्स आणि फर्म्सना ठोठावला ७.४१ कोटींचा दंड, पाहा नक्की काय आहे प्रकरण

Giving tips on shares on business channel SEBI has taken a big action against experts and firms share profit investment | वाहिनीवर शेअर्सच्या टिप्स देणं पडलं महागात, सेबीनं एक्सपर्ट्स आणि फर्म्सवर केली मोठी कारवाई

वाहिनीवर शेअर्सच्या टिप्स देणं पडलं महागात, सेबीनं एक्सपर्ट्स आणि फर्म्सवर केली मोठी कारवाई

SEBI Action On Share Tips: बाजार नियामक सेबीनं (SEBI) एक महत्त्वाचा निर्णय घेत एका बिझनेस वाहिनीच्या १५ गेस्ट एक्सपर्ट्सवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. बेकायदेशीर ट्रेडिंग करण्याच्या कारणामुळे सेबीनं हा आदेश दिला आहे. यासोबतच सेबीनं आपल्या आदेशात या वाहिनीवर येणाऱ्या काही एक्सपर्ट्सना बेकायदेशीर फायद्यांसाठी ७.४१ कोटी रुपये भरण्यास सांगितलंय.
 

१५ गेस्ट एक्सपर्ट्सवर कारवाई
 

सेबीच्या म्हणण्यानुसार, १ फेब्रुवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत वाहिनीवर दिसणाऱ्या १५ गेस्ट एक्सपर्ट्सवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातील काही जण थेट बेकायदेशीर ट्रेडमध्ये सामील होते. सेबीनं आपल्या आदेशात म्हटलंय की, त्यापैकी काहींना पुढील आदेश येईपर्यंत बाजारात ट्रेडिंग करण्यासही मनाई करण्यात आलीये.
 

यांच्यावर झाली कारवाई
 

सेबीने ज्यांच्यावर कारवाई केली आहे त्यात सिमी भौमिक, मुदित गोयल, हिमांशू गुप्ता, आशिष केळकर, किरण जाधव, रामावतार लालचंद चोटिया, एसएआर सिक्युरिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, अजय कुमार रमाकांत शर्मा, रुपेश कुमार माटोलिया, नितीन छलानी, कन्ह्या ट्रेडिंग कंपनी, मनन शेअरकॉम प्रायव्हेट लिमिटेड, एसएआर कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेड, पार्थ सारथी धर आणि निर्मल कुमार सोनी यांचा समावेश आहे.
 

नियमांचं उल्लंघन
 

तपासादरम्यान गोळा केलेल्या पुराव्यांवरून असं दिसून आलं की गेस्ट एक्सपर्ट्सनं वाहिनीवर शिफारशी प्रसारित होण्यापूर्वी त्यांच्या शिफारशींसंबंधीची आगाऊ माहिती प्रॉफिट एक्सपर्ट्ससोबत शेअर केली होती, अशी माहिती सेबीचे सदस्य कमलेश वार्ष्णेय यांनी दिली.
 

माहिती मिळाल्यानंतर प्रॉफिट कमावलेल्या शेअर्सनं पोझिशन घेतली आणि वाहिनीवर रेकमेंडेशन प्रसारित झाल्यानंतर पोझिशन्स लिक्विडिडेट केल्या. नंतर प्रॉफिट पूर्वीच्या समजूतीनुसार नफा गेस्ट एक्सपर्ट्ससोबत वाटून घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Web Title: Giving tips on shares on business channel SEBI has taken a big action against experts and firms share profit investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.