Lokmat Money > बिझनेस न्यूज > हिंदुस्थान एअरोनॉटिक्सची जागतिक झेप

हिंदुस्थान एअरोनॉटिक्सची जागतिक झेप

हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) प्रतिष्ठेचे समजले जाणारे अशिया-पॅसिफिक एअरोस्पेस क्लॉलिटी ग्रुपचे (एपीएक्युजी) सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे.

By admin | Published: September 17, 2016 05:37 AM2016-09-17T05:37:22+5:302016-09-17T05:37:22+5:30

हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) प्रतिष्ठेचे समजले जाणारे अशिया-पॅसिफिक एअरोस्पेस क्लॉलिटी ग्रुपचे (एपीएक्युजी) सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे.

Global Arrival of Hindustan Aeronautics | हिंदुस्थान एअरोनॉटिक्सची जागतिक झेप

हिंदुस्थान एअरोनॉटिक्सची जागतिक झेप

बंगळुरू : हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) प्रतिष्ठेचे समजले जाणारे अशिया-पॅसिफिक एअरोस्पेस क्लॉलिटी ग्रुपचे (एपीएक्युजी) सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. हे सदस्यत्व ‘मतदानाच्या हक्कासह पूर्ण सदस्यत्व’ या वर्गातील आहे.
एपीएक्युजीचे सदस्यत्व इंटरनॅशनल एअरोस्पेस क्वॉलिटी ग्रुप अंतर्गत प्राप्त करणारा भारत हा जगात सातवा देश आहे.
इतर देशांमध्ये चीन, दक्षिण कोरिया, तैवान, इंडोनेशिया, सिंगापूर आणि जपानचा समावेश आहे, असे कंपनीने निवेदनाद्वारे कळविले आहे.
एअरोस्पेस क्वॉलिटीमध्ये सुधारणा घडविण्याचे काम करणाऱ्या एअरोस्पेस क्वॉलिटीचे सदस्यत्व मिळाल्यामुळे एचएएल जागतिक पातळीवर पोहोचला आहे. आता एचएएल जागतिक पातळीवरील कार्यक्रमांत सहभागी होऊ शकेल तसेच सध्याचा आणि नवा दर्जा सुधारणे व त्याचा आढावा घेणे यातही त्याला भाग घेता येईल, असे एचएएलचे मुख्य कार्यकारी संचालक टी. सुवर्णा राजू यांनी सांगितले.

Web Title: Global Arrival of Hindustan Aeronautics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.