Lokmat Money > बिझनेस न्यूज > बुधवारी मुंबईमध्ये ग्लोबल एक्झिबिशन डे

बुधवारी मुंबईमध्ये ग्लोबल एक्झिबिशन डे

जगभरात दरवर्षी ७ जून रोजी ग्लोबल एक्झिबिशन डे जगभरात दरवर्षी साजरा होतो

By admin | Published: June 6, 2017 04:31 AM2017-06-06T04:31:32+5:302017-06-06T04:31:32+5:30

जगभरात दरवर्षी ७ जून रोजी ग्लोबल एक्झिबिशन डे जगभरात दरवर्षी साजरा होतो

Global Exhibition Day in Mumbai on Wednesday | बुधवारी मुंबईमध्ये ग्लोबल एक्झिबिशन डे

बुधवारी मुंबईमध्ये ग्लोबल एक्झिबिशन डे

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जगभरात दरवर्षी ७ जून रोजी ग्लोबल एक्झिबिशन डे जगभरात दरवर्षी साजरा होतो. यंदा भारतातील प्रदर्शन उद्योगांशी संबंधित सर्व घटकांनी पहिल्यांदाच या निमित्ताने ७ जून रोजी गोरेगावच्या बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये प्रदर्शन क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेण्याचे ठरविले आहे.
यामध्ये प्रदर्शन आयोजक, वेन्यू ओनर्स आणि सेवा पुरवठादारांचे सहभागी होणार आहेत. जगभरात दरवर्षी ३१ हजारांहून अधिक मुख्य ट्रेड शो आणि प्रदर्शने भरत असतात. भारतात प्रदर्शन उद्योगक्षेत्र ६५ हजार कोटींचे असून, दरवर्षी ७00 हून अधिक मुख्य प्रदर्शने देशात भरतात. या उद्योगाचा भारतातील वृद्धिदर १ टक्के आहे.
भारतातही अनेक कंपन्या त्यांच्या एकूण मार्केटिंग बजेटच्या २0 टक्के भाग प्रदर्शने आणि ट्रेड शोवर खर्च करतात. नव्या व उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये, औद्योगिक आणि व्यापारी विकासात मोलाची भूमिका बजावणे, औद्योगिक विकास व तंत्रज्ञानविषयक आदान-प्रदान घडवणे, प्रादेशिक आणि राष्ट्रीय उद्योगाला प्रोत्साहन देणे यांसाठी प्रदर्शन व ट्रेड शोचा मोठा फायदा होत असतो.

Web Title: Global Exhibition Day in Mumbai on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.