Lokmat Money > बिझनेस न्यूज > जागतिक गुंतवणूकदारांच्या नजरा भारताकडे: पंतप्रधान, विकासात योगदान देण्याचे आवाहन

जागतिक गुंतवणूकदारांच्या नजरा भारताकडे: पंतप्रधान, विकासात योगदान देण्याचे आवाहन

आपल्या सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्तीची अजिबात कमतरता नाही. ‘राष्ट्र प्रथम दृष्टिकोन’ लक्षात घेऊन सरकार निर्णय घेत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 07:26 AM2024-07-31T07:26:01+5:302024-07-31T07:26:22+5:30

आपल्या सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्तीची अजिबात कमतरता नाही. ‘राष्ट्र प्रथम दृष्टिकोन’ लक्षात घेऊन सरकार निर्णय घेत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

global investors eye india pm modi calls for contribution to development | जागतिक गुंतवणूकदारांच्या नजरा भारताकडे: पंतप्रधान, विकासात योगदान देण्याचे आवाहन

जागतिक गुंतवणूकदारांच्या नजरा भारताकडे: पंतप्रधान, विकासात योगदान देण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : जगभरातील गुंतवणूकदारांच्या नजरा सध्या भारताकडे लागल्या आहेत. ही ‘सुवर्ण संधी’ देशांतर्गत उद्योगांनी न गमावता २०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. 
 
‘विकसित भारताच्या दिशेने प्रवास’ या विषयावर ‘भारतीय उद्योग महासंघा’ने आयोजित केलेल्या परिषदेत त्यांनी सांगितले की, आपल्या सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्तीची अजिबात कमतरता नाही. ‘राष्ट्र प्रथम दृष्टिकोन’ लक्षात घेऊन सरकार निर्णय घेत आहे. 

उद्याेगांसाठी सुवर्णसंधी

आज संपूर्ण जग तुमच्याकडे पाहत आहे. सरकारची धोरणे, बांधीलकी आणि गुंतवणूक जागतिक विकासाचा पाया बनत आहे. जगभरातील गुंतवणूकदार भारतात येण्यास इच्छुक आहेत. जगभरातील नेतेही सकारात्मक आहेत. ही सुवर्ण संधी आहे. ती आपण गमावता कामा नये. भारतास २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्यासाठी उद्योगांनी सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करायला हवे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
 

Web Title: global investors eye india pm modi calls for contribution to development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.