Lokmat Money > बिझनेस न्यूज > जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावात घसरण

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावात घसरण

अमेरिकेच्या रोजगाराच्या आकडेवारीच्या प्रतीक्षेत आशियाई बाजारात सावधानता बाळगत व्यवहार झाल्याने कच्च्या तेलाचे भाव उतरले. परिणामी वायदे व्यवहाराही मंदावले.

By admin | Published: September 4, 2015 10:11 PM2015-09-04T22:11:51+5:302015-09-04T22:11:51+5:30

अमेरिकेच्या रोजगाराच्या आकडेवारीच्या प्रतीक्षेत आशियाई बाजारात सावधानता बाळगत व्यवहार झाल्याने कच्च्या तेलाचे भाव उतरले. परिणामी वायदे व्यवहाराही मंदावले.

The global market has fallen in the form of crude oil | जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावात घसरण

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावात घसरण

सिंगापूर : अमेरिकेच्या रोजगाराच्या आकडेवारीच्या प्रतीक्षेत आशियाई बाजारात सावधानता बाळगत व्यवहार झाल्याने कच्च्या तेलाचे भाव उतरले. परिणामी वायदे व्यवहाराही मंदावले. आशिया बाजारातही कच्च्या तेलाचा वायदे भाव ०.२३ टक्क्यांनी घसरत प्रति बॅरल ३,०७९ रुपयांवर आला.
दरम्यान, न्यूयॉर्कच्या बाजारात आॅक्टोबरमध्ये वितरित करण्यात येणाऱ्या तेलाचा (वायदे भाव) भाव १७ सेंटने गडगडत प्रति बॅरल ४६.५८ डॉलरवर आला. तसेच ब्रेन्ट क्रूड आॅईलचा वायदे भावही १६ सेंटने कमी होत प्रति बॅरल ५०.५२ डॉलरवर आला.
अमेरिका आॅगस्ट महिन्यातील रोजगाराची आकडेवारी जारी करणार आहे. त्यानुसार फेडरल रिझर्व्ह व्याजदराबाबत निर्णय घेऊ शकते. अशा स्थितीत सावधानता बाळगतच वायदे व्यवहार झाले.
आंतरराष्ट्रीय बाजारातील उतरता कल पाहता आशिया बाजारातही कच्च्या तेलाचा भाव ०.२३ टक्क्यांनी घसरत प्रति बॅरल ३,०७९ रुपयांवर आला.
एमसीएक्समध्ये सप्टेंबर महिन्यात वितरित होणाऱ्या तेलाचा भाव ७ रुपयांनी कमी होत प्रति बॅरल ३०७९ रुपयांवर आला. तसेच आॅक्टोबर महिन्यातील वायदे भावही ३ रुपयांनी कमी होत प्रति बॅरल ३,१३८ रुपयांवर आला.

Web Title: The global market has fallen in the form of crude oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.