Lokmat Money > बिझनेस न्यूज > फिच'ला भारताच्या अर्थव्यवस्थेवर भरवसा! रेटींग कायम ठेवले, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील

फिच'ला भारताच्या अर्थव्यवस्थेवर भरवसा! रेटींग कायम ठेवले, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील

ग्लोबल रेटींग एजन्सी फिच'ने भारतीय अर्थव्यवस्थेवर भरवसा दाखवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 10:49 AM2024-01-17T10:49:30+5:302024-01-17T10:54:47+5:30

ग्लोबल रेटींग एजन्सी फिच'ने भारतीय अर्थव्यवस्थेवर भरवसा दाखवला आहे.

global rating agency fitch confirmed india ratings said that economy will grow rapidly | फिच'ला भारताच्या अर्थव्यवस्थेवर भरवसा! रेटींग कायम ठेवले, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील

फिच'ला भारताच्या अर्थव्यवस्थेवर भरवसा! रेटींग कायम ठेवले, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील

ग्लोबल रेटींग एजन्सीने भारतासाठी आनंदाची बातमी दिली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेवर फिचने भरवसा दाखवला असून भारताची अर्थव्यवस्था २०२४ मध्ये वाढ राहिल असा अंदाज व्यक्त केला. रेटिंग एजन्सीने भारतासाठी 'BBB-' हे रेटिंग कायम ठेवले आहे. २०२४ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ६.९ टक्के दराने वाढण्याची शक्यताही फिचने वर्तवली आहे.   

Petrol-Diesel Price : १० रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतं पेट्रोल-डिझेल, लवकरच होऊ शकते घोषणा

फिच'ने भारताबाबत देशाची अर्थव्यवस्था स्थिर राहील असे म्हटले आहे. भारताचे दीर्घकालीन विदेशी चलन इश्यूअर डीफॉल्ट रेटिंग 'BBB-' राहील. तसेच अनेक वर्षे देशाची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर राहील, असा अंदाजही व्यक्त केला. एजन्सीच्या मते, FY2024 नंतर वित्तीय मार्गावर कमी निश्चितता आहे आणि आर्थिक वाढ आणि एकत्रीकरण यांच्यातील व्यापार-संबंध अधिक तीव्र होऊ शकतात. चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा जीडीपी ६.९ टक्के असा अंदाज करताना, एजन्सीने म्हटले आहे की मे २०२३ मध्ये आम्ही अंदाजित केलेल्या ६ टक्क्यांपेक्षा हे खूप जास्त आहे. रेटिंग एजन्सीने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ६.५ टक्के जीडीपीचा अंदाज व्यक्त केला होता.

देशात खासगी गुंतवणुकीची कमतरता भासणार नाही
गुंतवणुकीच्या आघाडीवर, फिचने सांगितले की, देशात खासगी गुंतवणुकीची कोणतीही कमतरता भासणार नाही. आर्थिक विकासात गुंतवणूक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. भारतात खासगी गुंतवणूक हळूहळू वाढेल. देशांतर्गत बचतीचे आकडे कमी असल्याने वापरातही सुधारणा होईल.

बँकांची मजबूत स्थिती आणि कॉर्पोरेट बॅलन्स शीटमधील सुधारणा यामुळे गुंतवणुकीसाठी सकारात्मक वातावरण राहील, असे फिचने आपल्या अहवालात म्हटले आहे. मात्र, फिचने श्रमिक बाजाराबाबतही चिंता व्यक्त केली आहे. महिलांचा सहभाग वाढवणे अत्यंत गरजेचे असल्याचे रेटिंग एजन्सीचे म्हणणे आहे. महिलांच्या रोजगारासाठी ही सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर त्याचा दृष्टिकोनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

रेटिंग एजन्सीनुसार, देशात चलनवाढीचे आकडे ठप्प झाले आहेत. आमचा अंदाज आहे की, आर्थिक वर्ष २०२४ च्या अखेरीस महागाई ४.७ टक्क्यांपर्यंत घसरेल, जे डिसेंबर २०२३ मध्ये ५.७ टक्के होती. याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पॉलिसी रेटमध्ये ७५ बेसिस पॉइंटने कपात करू शकते असा अंदाज फिचने व्यक्त केला आहे.

Web Title: global rating agency fitch confirmed india ratings said that economy will grow rapidly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत