नवी दिल्ली :
जगभरात कर्मचारी कपात तेजीत असताना भारतात मात्र भरतीचा हंगाम सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून भारतात नव्या वर्षात अवघ्या २१ दिवसांत बेरोजगारीचा दर १.१६ टक्के घसरला आहे.
अमेरिकेसह जगभरातील बँका कर्मचारी कपात करीत असताना भारतात अनेक बँकांनी भरती केली आहे. भारतातील सर्वांत मोठी खासगी बँक एचडीएफसीने सप्टेंबर ते डिसेंबर २०२२ या काळात ५,८६३ कर्मचारी, तर बंधन बँकेने २,०३६ कर्मचारी भरले. आयसीआयसीआय बँकेने मार्च ते डिसेंबर २०२२ या काळात ११,२०० कर्मचाऱ्यांची भरती केली. इतरही अनेक क्षेत्रात कर्मचारी भरती करण्याचा कल दिसून आला आहे. आतापर्यंत अमेरिकेत २ लाख आयटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. इतरही अनेक देशांत अशीच स्थिती आहे.
काय अहवाल सांगतो?
- रिझर्व्ह बँकेचा ताजा अहवाल व एसबीआयचे बँकिंग तज्ज्ञ नरेश मल्होत्रा यांच्या म्हणण्यानुसार, मागील २ वर्षे भारतीय बँकांसाठी संकटाची होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. यंदा बँकिंग क्षेत्रात विक्रमी वृद्धी दिसेल, असा अंदाज आहे.
- सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) अहवालानुसार, १ जानेवारी २०२३ रोजी देशातील बेरोजगारीचा दर ८.३०% होता. २२ जानेवारी रोजी तो १.१६% घसरून ७.१४% झाला आहे. शहरांतील बेरोजगारीचा दर ८.८%, तर ग्रामीण भागातील ६.४% आहे.
या क्षेत्रात असतील संधी
- आरोग्य सेवा : मेडिकल रिक्रुटर
- वाहतूक : ड्रोन पायलट
- मॅन्युफॅक्चरिंग
- प्रोफेशन सर्व्हिसेस : डेटा ॲनालिस्ट.
- बिझनेस डेव्हलपमेंट : बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर, मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह.
- सेल्स डेव्हलपमेंट : सेल्स डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट ऑफिसर, मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह.
- सेल्स अँड मार्केटिंग : क्लोजिंग मॅनेजर.
- तंत्रज्ञान, मीडिया, मनोरंजन : स्ट्रॅटेजिक ग्रोथ स्पेशालिस्ट. कंटेंट रायटर.