Join us  

'गो फर्स्ट' निघणार दिवाळखोरीत, अर्ज वैध; विमाने भाड्याने देणाऱ्या कंपन्यांना झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 11:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : हवाई वाहतूक कंपनी 'गो फर्स्ट'चा स्वेच्छा दिवाळखोरीचा अर्ज स्वीकारण्याचा राष्ट्रीय कंपनी लवादाचा (एनसीएलटी) ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : हवाई वाहतूक कंपनी 'गो फर्स्ट'चा स्वेच्छा दिवाळखोरीचा अर्ज स्वीकारण्याचा राष्ट्रीय कंपनी लवादाचा (एनसीएलटी) आदेश राष्ट्रीय कंपनी अपील लवादाने (एनसीएलएटी) वैध ठरविला आहे. त्यामुळे कंपनीला विमाने भाडेपट्टीवर देणाऱ्या कंपन्यांना झटका बसला आहे.

गो फर्स्टच्या दिवाळखोरी प्रक्रियेस या कंपन्यांनी विरोध केला असून, त्यास कंपन्यांनी अपील लवादाकडे आव्हान दिले होते. अपील लवादाचे चेअरमन अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील २ सदस्यीय पीठाने या कंपन्यांना पुन्हा 'एनसीएलटी कडे जाण्यास सांगितले आहे.

जेट एअरवेजबाबत ३० मे रोजी निर्णयचार वर्षापासून बंद असलेल्या जेट एअरवेजच्या १५० कोटी रुपयांच्या बँक हमीबाबत राष्ट्रीय कंपनी कायदा अपील लवाद ३० मे रोजी निर्णय देणार आहे. बँक हमी वापरण्यासाठी एसबीआयने लवादाकडे अर्ज केला असून, जेटच्या अधिग्रहणाची बोली जिंकणाऱ्या जालान कालरॉकने त्यास विरोध केला आहे.