पणजी - गो-एअर कंपनीचे विमान गोवा href='http://www.lokmat.com/topics/airport/'>विमानतळावर उभे असल्याची तक्रार एका प्रवाशाने ट्विटरवरुन केली आहे. शुक्रवारी सायंकाळी 5.30 pm वाजता गो-एअरचे हे विमान 100 पेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन दिल्लीला जाणार होते. मात्र, 3 तासांनतरही विमानाने टेक ऑफ न केल्याने प्रवाशी चांगलेच वैतागले आहेत. तर रात्रभर प्रवाशांना विमानतळावर ताटकळत बसावे लागणे, हे लाजीरवाणे असल्याचेही एका ट्विटर युजरने म्हटले आहे.
गो-एअर विमानाने आम्हाला गेल्या 3 तासांपासून पणजी विमानतळावर ताटकळत बसवले आहे. विमानातील 100 पेक्षा जास्त प्रवाशांना केवळ 2 समोसे देण्यात आले आहेत. त्यानंतर, इंधन भरण्यासाठी हे विमान पुन्हा विमानतळ परिसरात नेण्यात आले. पण, आम्हाला याबाबत कुठलिही कल्पना देण्यात आली नसल्याचे या विमानातील प्रवाशी तख्तार सिम्रीता यांनी ट्विट करुन म्हटले आहे. तसेच याबाबत विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी गो-एअरशी फोनद्वारे चौकशी केली. मात्र, हा जोक तर नाही ना, असा उलट सवालच गो-एअरकडून करण्यात आला. दरम्यान, या घटनेनंतर गो-एअरने ट्वीटरवरुनच संबंधित प्रवाशांची माफी मागितली आहे.
Worst flight ever!! Never ever gonna travel by @goair again
— Internalised chaos (@TakhtarSimrita) October 5, 2018
Kept us on the Goa runway for three hours, gave out two samosas for a 100 plus people flight, took back flight for refuelling.
Have made us deboard & no-one has any fucking idea what's happening