Lokmat Money > बिझनेस न्यूज > Godavari Biorefineries IPO : महाराष्ट्रातील केमिकल क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीचा IPO लिस्टिंगमध्ये आपटला; शेअरची किंमत 12% ने खाली

Godavari Biorefineries IPO : महाराष्ट्रातील केमिकल क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीचा IPO लिस्टिंगमध्ये आपटला; शेअरची किंमत 12% ने खाली

Godavari Biorefineries IPO Listing: आज गोदावरी बायोरिफायनरीजचा आयपीओ बाजारात लिस्ट झाला आहे. शेअर्स इश्यू किमतीवर ११-१२% सवलतीवर लिस्ट झालेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 11:18 AM2024-10-30T11:18:19+5:302024-10-30T11:18:19+5:30

Godavari Biorefineries IPO Listing: आज गोदावरी बायोरिफायनरीजचा आयपीओ बाजारात लिस्ट झाला आहे. शेअर्स इश्यू किमतीवर ११-१२% सवलतीवर लिस्ट झालेत.

Godavari Biorefineries shares list at 12.5% discount on NSE | Godavari Biorefineries IPO : महाराष्ट्रातील केमिकल क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीचा IPO लिस्टिंगमध्ये आपटला; शेअरची किंमत 12% ने खाली

Godavari Biorefineries IPO : महाराष्ट्रातील केमिकल क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीचा IPO लिस्टिंगमध्ये आपटला; शेअरची किंमत 12% ने खाली

Godavari Biorefineries IPO Listing : ऑक्टोबर महिन्यात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात उलथापालथ पाहायला मिळाली. ह्युंदाई कंपनीने मागच्या आठवड्यात देशातील सर्वात मोठा आयपीओ बाजारात आणला होता. मात्र, गुंतवणूकदारांनी याकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळालं. अशा परिस्थितीत आणखी एका कंपनीला याचा फटका बसला आहे. इथेनॉल आधारित रसायने तयार करणाऱ्या कंपनीने शेअर बाजारात संथ एन्ट्री केली.

आज गोदावरी बायोरिफायनरीजचा आयपीओ बाजारात लिस्ट झाला. शेअर इश्यू किमतीवर ११-१२% सवलतीवर लिस्टींग आहे. गोदावरी बायोरिफायनरीजच्या IPO अंतर्गत इश्यूची किंमत ३५२ रुपये ठेवण्यात आली होती. त्या तुलनेत, कंपनीचे शेअर्स NSE वर १२.५% ​​च्या सवलतीसह ३०८ रुपयांवर लिस्टेड झाले. त्याचवेळी, ते ११.८% च्या सवलतीत ३१०.५५ रुपयांवर BSE वर लिस्टेड आहे. इथेनॉल आधारित केमिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने ५५५ कोटी रुपयांचा IPO आणला होता. ज्यामध्ये OFS चा आकार २३० कोटी रुपये होता. त्याला एकूण १.८७ पट सबस्क्रिप्शन मिळाले.

NSE डेटानुसार, प्रारंभिक शेअर विक्रीसाठी ठेवलेल्या १,१२,७४,७३९ शेअर्सपैकी ६०,८९,८३२ शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली होती. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदार (RII) विभागाला ९६ टक्के सबस्क्रिप्शन मिळाले तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार वर्गाला २६ टक्के बोली प्राप्त झाली. गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडने उघडण्यापूर्वी अँकर (मोठ्या) गुंतवणूकदारांकडून १६६ कोटी रुपये उभे केले होते.

आयपीओमध्ये ३२५ कोटी रुपये किमतीचे ताजे इक्विटी शेअर्स आणि प्रवर्तक आणि गुंतवणूकदार यांच्याकडून २३० कोटी रुपयांपर्यंतच्या ६५.२७ लाख इक्विटी शेअर्सचे ऑफर फॉर सेल (OFS) यांचा समावेश होता. अशा प्रकारे आयपीओचे एकूण आकार ५५५ कोटी रुपये होते. ऑफरची किंमत ३३४-३५२ रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली होती.

ताज्या इश्यूमधील २४० कोटी रुपये कर्ज परतफेडीसाठी वापरले जाणार असून उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरली जाईल. महाराष्ट्रातील गोदावरी बायोरिफायनरीज ही भारतातील इथेनॉल-आधारित रसायनांच्या प्रमुख उत्पादकांपैकी एक आहे. कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये जैव-आधारित रसायने, साखर, इथेनॉलचे विविध ग्रेड आणि पॉवर यांचा समावेश आहे.
 

Web Title: Godavari Biorefineries shares list at 12.5% discount on NSE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.