Lokmat Money > बिझनेस न्यूज > Godawari Power and Ispat shares : अधिक पैसे देऊन आपलेच शेअर खरेदी करणार 'ही' कंपनी, वृत्तानंतर गुंतवणूकदाराच्या शेअरवर उड्या

Godawari Power and Ispat shares : अधिक पैसे देऊन आपलेच शेअर खरेदी करणार 'ही' कंपनी, वृत्तानंतर गुंतवणूकदाराच्या शेअरवर उड्या

Godawari Power and Ispat shares :अधिक पैसे देऊन आपलेच शेअर खरेदी करणार 'ही' कंपनी, वृत्तानंतर गुंतवणूकदाराच्या शेअरवर उड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 03:13 PM2024-06-18T15:13:27+5:302024-06-18T15:14:38+5:30

Godawari Power and Ispat shares :अधिक पैसे देऊन आपलेच शेअर खरेदी करणार 'ही' कंपनी, वृत्तानंतर गुंतवणूकदाराच्या शेअरवर उड्या

Godawari Power and Ispat shares company will buy its own shares by paying more money investor s shares jumped after the news. | Godawari Power and Ispat shares : अधिक पैसे देऊन आपलेच शेअर खरेदी करणार 'ही' कंपनी, वृत्तानंतर गुंतवणूकदाराच्या शेअरवर उड्या

Godawari Power and Ispat shares : अधिक पैसे देऊन आपलेच शेअर खरेदी करणार 'ही' कंपनी, वृत्तानंतर गुंतवणूकदाराच्या शेअरवर उड्या

Godawari Power and Ispat shares: गोदावरी पॉवर आणि इस्पातचे शेअर्समध्ये मंगळवारी फोकसमध्ये होते. कंपनीच्या शेअरमध्ये आज जबरदस्त खरेदी होत असून हा शेअर ९ टक्क्यांपर्यंत वधारला. शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठं कारण आहे. कंपनीच्या संचालक मंडळान ३०१ कोटी रुपयांच्या शेअर्सच्या पुनर्खरेदीला मंजुरी दिली आहे. त्यानंतर मंगळवार, १८ जून रोजी गोदावरी पॉवर आणि इस्पातचे शेअर्स ९ टक्क्यांहून अधिक वधारून ११७९.९५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता.
 

शेअरमध्ये सातत्यानं तेजी
 

गेल्या महिन्याभरात कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. शिवाय, हा शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी ४३७.१५ रुपयांवरून जवळपास १६० टक्क्यांनी वधारलाय. गोदावरी पॉवर आणि इस्पातच्या संचालक मंडळानं १५ जून रोजी २१.५ लाख इक्विटी शेअर्सच्या पुनर्खरेदीला १४०० रुपये प्रति शेअर या दराने मंजुरी दिली. यात ट्रस्टकडील ट्रेजरीतील ४५ लाख इक्विटी शेअर्सचा समावेश नाही. बायबॅक ऑफरची रेकॉर्ड डेट शुक्रवार, २८ जून २०२४ निश्चित करण्यात आली आहे.
 

शेअर बायबॅकमध्ये कंपनी शेअरहोल्डर्सकडून आपले शेअर्स परत विकत घेते. गुंतवणूकदारांना रोख रक्कम परत करण्यासाठी, बाजारातील अंतर्गत मूल्य वाढविण्यासाठी ही पद्धत फायदेशीर ठरते.
 

कंपनी व्यवसाय
 

गोदावरी पॉवर अँड इस्पात ही कंपनी प्रामुख्यानं लोहखनिज उत्खनन, स्पंज आयर्न, स्टील बिलेट, वायर रॉड, एचबी वायर आणि फेरो मिश्रधातू तसंच वीजनिर्मितीच्या व्यवसायात गुंतलेली आहे. या कंपनीच्या मालकीची अरी डोंगरी खाण आणि बोरिया टिबू खाण या दोन कॅप्टिव खाणी आहेत. यामुळे कंपनीचं मार्केट कॅप १५,३०० कोटी रुपयांनी वाढलंय.
 

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Godawari Power and Ispat shares company will buy its own shares by paying more money investor s shares jumped after the news.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.