Lokmat Money > बिझनेस न्यूज > गोदरेज प्रॉपर्टीजची रेकॉर्डब्रेक कामगिरी; तीन दिवसांत विकली 3000 कोटी रुपयांची 1050 घरे

गोदरेज प्रॉपर्टीजची रेकॉर्डब्रेक कामगिरी; तीन दिवसांत विकली 3000 कोटी रुपयांची 1050 घरे

Godrej Properties Stock Price: या रेकॉर्डब्रेक विक्रीमुळे कंपनीच्या शेअरमध्येही मोठी वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 02:45 PM2024-04-08T14:45:53+5:302024-04-08T14:46:17+5:30

Godrej Properties Stock Price: या रेकॉर्डब्रेक विक्रीमुळे कंपनीच्या शेअरमध्येही मोठी वाढ झाली आहे.

Godrej Properties India Real Estate: Record breaking performance of Godrej Properties; Houses worth Rs 3000 crore sold in just 3 days | गोदरेज प्रॉपर्टीजची रेकॉर्डब्रेक कामगिरी; तीन दिवसांत विकली 3000 कोटी रुपयांची 1050 घरे

गोदरेज प्रॉपर्टीजची रेकॉर्डब्रेक कामगिरी; तीन दिवसांत विकली 3000 कोटी रुपयांची 1050 घरे

Indian Real Estate Market: गेल्या काही काळापासून देशात घरांची मागणी झपाट्याने वाढत आहे. याचे ताजे उदाहरण गुरुग्राम शहरात पाहायला मिळते. मुंबईस्थित रिअल इस्टेट डेव्हलपर गोदरेज प्रॉपर्टीजने (Godrej Properties) गुरुग्राममध्ये गोदरेज झेनिथ(Godrej Zenith) नावाचा गृहनिर्माण प्रकल्प सुरू केला अन् अवघ्या तीन दिवसांत 3,000 कोटी रुपयांच्या फ्लॅटची विक्री झाली. यामुळे कंपनीच्या शेअर्समध्येही जोरदार तेजी पाहायला मिळत आहे.

तीन दिवसांत 3000 कोटी रुपयांची 1050 घरे विकली
गोदरेज प्रॉपर्टीजने निवेदन जारी करून याबाबत खुलासा केला. कंपनीने सांगितले की, कंपनीने हरियाणातील गुरुग्राम येथील सेक्टर 89 मध्ये गोदरेज जेनिथ नावाचा नवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यापासून अवघ्या तीन दिवसांत 3000 कोटी रुपयांची 1050 घरे विकली गेली. गोदरेज झेनिथच्या उत्कृष्ट विक्रीबद्दल कंपनीचे एमडी आणि सीईओ गौरव पांडे म्हणाले, गोदरेज जेनिथला मिळालेल्या प्रतिसादामुळे आम्ही खूप उत्साहित आहोत. ग्राहक आणि इतर भागधारकांचे आभार मानतो.

विक्रीत 473 टक्क्यांची वाढ 
गोदरेज जेनिथ हा गोदरेज प्रॉपर्टीजचा गुरुग्राममधील सर्वात मोठा प्रकल्प आहे. कंपनीने सांगितले की, 2023-24 या आर्थिक वर्षात गुरुग्रामच्या निवासी बाजारपेठेत कंपनीच्या विक्रीत 473 टक्क्यांची वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये, कंपनी गुरुग्रामच्या सेक्टर 103, सेक्टर 43 आणि सेक्टर 54 मध्ये नवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी, कंपनीने गुरुग्राममधील सेक्टर 40, गोल्फ कोर्स एक्स्टेंशन रोडवरील गोदरेज ॲरिस्टोक्रॅट नावाच्या प्रकल्पात 2875 कोटी रुपयांची इन्व्हेंटरी विकली होती.

शेअर्समध्ये 5 टक्क्यांहून अधिक उसळी 
गुरुग्राममध्ये अवघ्या तीन दिवसांत 3000 कोटी रुपयांच्या घरांच्या विक्रीचा विक्रम गाठल्यानंतर शेअर बाजारात गोदरेज प्रॉपर्टीजच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. आजच्या व्यवहारात कंपनीचे शेअर्स 4.86 टक्क्यांच्या वाढीसह 2620 रुपयांवर व्यवहार करत आहेत. यापूर्वी शेअरने 2692 रुपयांचा उच्चांक गाठला होता. गोदरेज प्रॉपर्टीजच्या स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना 133 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

(टीप-शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

Web Title: Godrej Properties India Real Estate: Record breaking performance of Godrej Properties; Houses worth Rs 3000 crore sold in just 3 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.