Join us  

GoFirst एअरलाईन्स पुन्हा उड्डाण घेणार, DGCA नं प्रस्तावाला दिली सशर्त मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 6:02 PM

गो फर्स्ट एअरलाईन्सला पुन्हा एकदा उड्डाण करण्याची परवानगी मिळाली आहे.

गो फर्स्ट (Go First) एअरलाईन्सला पुन्हा एकदा उड्डाण करण्याची परवानगी मिळाली आहे. डीजीसीएनं गोफर्स्टला सशर्त उड्डाणाची परवानगी दिली आहे. डीजीसीएनं गो फर्स्टचा पुन्हा उड्डाण करण्याचा प्रस्ताव सशर्त स्वीकारला आहे. ऑडिटनंतर नियामकानं निर्णय घेतलाय.

अधिकृत निवेदनानुसार, सर्व आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर गो फर्स्टला उड्डाण करण्याची परवानगी दिली जाईल. आयआरपीद्वारे अटींची पूर्तता केल्यानंतर डीजीसीएकडून फ्लाइट शेड्यूलची मंजुरी घ्यावी लागेल. त्यानंतर तिकीट बुकिंग सुरू होईल. बुकिंगसोबतच कंपनी रिफंडबाबतही पुढे जाऊ शकेल.

३ मे पासून विमान कंपनीनं त्यांची सर्व उड्डाणे सातत्यानं रद्द केली होती. दरम्यान, डीजीसीएनं आता काही अटी घालून दिल्या आहेत. यासाठी डीजीसीएने काही अटी घातल्या आहेत. एव्हिएशन रेग्युलेटरच्या म्हणण्यानुसार एअरलाइननं नेहमी एअर ऑपरेटरचं प्रमाणपत्र सोबत बाळगणं आवश्यक आहे. याशिवाय उड्डाणासाठी वापरले जाणारे विमान उड्डाणासाठी अधिक चांगल्या स्थितीत असावं. हँडलिंग फ्लाईटशिवाय कोणत्याही विमानाचा वापर केला जाऊ नये. डीजीसीएने सांगितलं की, कंपनीतील कोणत्याही बदलामुळे रिझोल्यूशन प्रोफेशनलच्या योजनेवर परिणाम होत असेल तर त्याची त्वरित माहिती द्यावी लागेल. याशिवाय नियामकांना फ्लाइट शेड्यूल, विमानाची स्थिती, वैमानिक, केबिन क्रू, एएमई, फ्लाइट डिस्पॅचर यांची माहिती देण्याची जबाबदारी रिझोल्यूशन प्रोफेशनलची असल्याचंही सांगण्यात आलंय.

रिफंडचे नियम काय?जर एखाद्या एअरलाइन कंपनीनं फ्लाइट रद्द केलं तर ते त्यांच्या प्रवाशांना तिकिटाचा 100 टक्के परतावा देतात. त्याचबरोबर प्रवाशांच्या शिफारशीनुसार रिफंडचीही व्यवस्था केली जाते.

टॅग्स :विमानव्यवसाय