Join us

सोने १००, तर चांदी २०० रुपयांनी स्वस्त

By admin | Published: October 20, 2015 3:43 AM

सराफा बाजारात सोमवारी सोने १० ग्रॅममागे १००, तर चांदी किलोमागे २०० रुपयांनी स्वस्त झाली. दागिने व नाणे बनविणाऱ्यांकडून मागणी कमी झाल्यामुळे जागतिक बाजारातही मागणी

नवी दिल्ली : सराफा बाजारात सोमवारी सोने १० ग्रॅममागे १००, तर चांदी किलोमागे २०० रुपयांनी स्वस्त झाली. दागिने व नाणे बनविणाऱ्यांकडून मागणी कमी झाल्यामुळे जागतिक बाजारातही मागणी मंदावल्याचा परिणाम भाव कमी होण्यावर झाला. भाव कमी झाल्यानंतर सोने १० ग्रॅमसाठी २७,१५० व चांदी ३७,१०० रुपये झाली.अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढ करील या अपेक्षेने जागतिक बाजारात सोन्याचा भाव गेल्या तीन महिन्यांतील सर्वाधिक झाला होता; परंतु तेथेच मागणी घटल्याचा परिणाम देशी बाजारावर झाला, असे व्यापाऱ्यांनीसांगितले.सिंगापूरच्या बाजारात सोने औंसमागे ०.५ टक्के स्वस्त होऊन १,१७१ अमेरिकन डॉलर तर चांदी ०.९ टक्क्यांनी स्वस्त होऊन १५.९० अमेरिकन डॉलर झाली. तयार चांदी किलोमागे २०० रुपयांनी घटून ३७,१०० व विकली बेसड् डिलिव्हरीची चांदी ४१५ रुपयांनी स्वस्त होऊन ३६,९८० रुपये किलो झाली. चांदीच्या १०० नाण्यांचा भाव खरेदीसाठी ५२,००० व विक्रीसाठी ५३,००० रुपये असा कायम होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)