Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold: सोन्यातून ३६६% रिटर्न! कोरोना, मंदी आणि महागाईमुळे सोन्याला झळाळी

Gold: सोन्यातून ३६६% रिटर्न! कोरोना, मंदी आणि महागाईमुळे सोन्याला झळाळी

Gold: शेअर बाजारात होत असलेली पडझड, जगात वहात असलेले मंदीचे वारे आणि महागाई यामुळे सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 06:02 AM2023-01-30T06:02:39+5:302023-01-30T06:03:04+5:30

Gold: शेअर बाजारात होत असलेली पडझड, जगात वहात असलेले मंदीचे वारे आणि महागाई यामुळे सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत.

Gold: 366% return from gold! Gold surges due to Corona, recession and inflation | Gold: सोन्यातून ३६६% रिटर्न! कोरोना, मंदी आणि महागाईमुळे सोन्याला झळाळी

Gold: सोन्यातून ३६६% रिटर्न! कोरोना, मंदी आणि महागाईमुळे सोन्याला झळाळी

मुंबई : शेअर बाजारात होत असलेली पडझड, जगात वहात असलेले मंदीचे वारे आणि महागाई यामुळे सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. १५ वर्षांत, सोन्याने ३६६% परतावा दिला, जो शेअर बाजारापेक्षा १७९% अधिक आणि एफडीपेक्षा १६४% अधिक आहे. 
२०२२ मध्ये उद्योग पुन्हा सुरू झाले, मागणी वाढली, त्यासोबतच युद्ध आणि इतर कारणांमुळे महागाई वाढली. परिणामी शेअर बाजार अस्थिर झाला असून, गुंतवणूकदारांनी पुन्हा सोन्यातील गुंतवणूक वाढवली आहे. त्यामुळे सोन्याचे भाव उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत.
या वर्षी किती वाढेल सोने? 

२०२३ मध्येही सोने १०% पेक्षा जास्त परतावा देईल असे तज्ञांचे मत आहे. सोन्याची किंमत प्रतिदहा ग्रॅम ६३ हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. येत्या काही दिवसांत लग्नसराईच्या खरेदीला वेग येईल, त्याचाही परिणाम सोने खरेदीवर होईल. याचवर्षी चांदीही ८० हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचण्याची शक्यता आहे.

कोणत्या गुंतवणुकीत सर्वाधिक फायदा?
मालमत्ता     ५ वर्ष     १० वर्ष     १५ वर्ष     २० वर्ष
सोने     ९,३६८     ९,९४९     २३,५६०       ५२,५८९ 
    (८७%)     (९९%)     (३७१%)    (९५२%)
शेअर्स     ८,२२९     १४,९९६     १६,१५०       ९०,२००          (६५%)    (२००%)    (१९२%)    (१७०४%)
चांदी     ८३१९     ६३४६      १४,५७७   ४४,७५२  
    (६६%)     (२७%)    (१९२%)    (७९५%)
एफडी     ७,२६७   १०,५६०      १५,३४७      २२,३०४ 
    (४१%)    (१११%)    (२०७%)    (३४६%)

५ हजार रुपयांची गुंतवणूक केली तर कोणत्या असेटमध्ये किती रिटर्न मिळाले असते. (परताव्याची तुलना २९ जानेवारी २०२३च्या आधारावर)

सोने स्वस्त कधी होणार?
nइंडिया बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशनचे सचिव सुरेंद्र मेहता यांनी सांगितले की, विदेशातून सोने डॉलरमध्ये आयात केले जाते. 
nत्यामुळेच डॉलरच्या मजबुतीमुळे भारतीय बाजारातील किमती दुपटीने वाढल्या.
n६-९ महिन्यांत सोन्याची किंमत किंमत ६३ हजार रुपये/ दहा ग्रॅमपर्यंत जाऊ शकते. पण त्यानंतर सोन्याचे दर  पुन्हा खाली येऊ शकतात.

Web Title: Gold: 366% return from gold! Gold surges due to Corona, recession and inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.