Join us

सोने पुन्हा ६७ हजारी! ७ दिवसांत १ हजाराने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 07:49 IST

दरवाढीच्या शक्यतेने ग्राहकांची पावले पुन्हा सराफा बाजाराकडे वळली आहेत. भाव ७० हजारांवर जाण्याचे संकेत आहेत.

नागपूर : सात दिवसांनंतर नागपुरात दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर पुन्हा ६७ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम बुधवारी देशांतर्गत झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरवाढीच्या शक्यतेने ग्राहकांची पावले पुन्हा सराफा बाजाराकडे वळली आहेत. भाव ७० हजारांवर जाण्याचे संकेत आहेत.

२० मार्चला शुद्ध सोन्याचे दर ६६ हजारांवर होते. २१ मार्चला खुलत्या बाजारात तब्बल १२०० रुपयांची वाढ होऊन भाव ६७,२०० रुपयांवर गेले. २२ मार्चला भाव पुन्हा ६६,५०० रुपयांवर स्थिरावले. २३ मार्चला भाव पुन्हा १०० रुपयांनी घसरले. २३ आणि २४ मार्चला देशात सराफा बाजारात व्यवहार झाले नाहीत.

मात्र, २६ मार्चला सकाळच्या सत्रात भाव २०० रुपयांनी वाढून  सायंकाळी ६६,९०० रुपयांपर्यंत वाढले. २७ मार्चला सकाळी सोने १०० रुपयांनी कमी होऊन ६६,८०० रुपये आणि सायंकाळी २०० रुपयांनी वाढून ६७ हजारांची पातळी गाठली. २२ कॅरेट सोन्याचे भाव ६२,३०० रुपयांपर्यंत वाढले.

टॅग्स :सोनंव्यवसाय