Join us

सोने पुन्हा २६ हजारांवर

By admin | Published: August 13, 2015 1:54 AM

जगभरातील प्रमुख सराफा बाजारातील तेजीसोबत किरकोळ व्यापाऱ्यांकडून मागणी वाढल्याने दिल्ली सराफा बाजार सोने आणि चांदीच्या झळाळीने उजळून निघाला.

नवी दिल्ली : जगभरातील प्रमुख सराफा बाजारातील तेजीसोबत किरकोळ व्यापाऱ्यांकडून मागणी वाढल्याने दिल्ली सराफा बाजार सोने आणि चांदीच्या झळाळीने उजळून निघाला. या वर्षात एकाच दिवशी ६०० रुपयांनी वधारत दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव २६ हजारांवर (प्रति दहा ग्रॅम) गेला.रुपयातील घसरणीमुळे सोने-चांदीची चकाकी वाढण्यास बळ मिळाले. जागतिक सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस ११०० डॉलरवर होता. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने सोन्याची आयात महागणार आहे.दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भावही ६४० रुपयांनी वधारत ३५,७०० रुपयांवर (प्रति किलो) गेला. चांदीच्या व्यवसायातील उद्योगांनी आणि नाणे तयार करणाऱ्यांंनी खरेदी केल्याने चांदीची झळाळी वाढली.चीनने आपल्या चलनाचे सलग दुसऱ्या दिवशीच अवमूल्यन केल्याने सोन्याची मागणी वाढल्याने सराफा बाजारात तेजी आली, असे जाणकारांनी सांगितले.