नवी दिल्ली : सणासुदीच्या काळातील मागणी पूर्ण करण्यासाठी ज्वेलर्सनी जोरदार खरेदी केल्यामुळे राजधानी दिल्लीत सोने १५0 रुपयांनी वाढून ३१,२00 रुपये तोळा झाले. चांदीही २00 रुपयांनी वाढून ४५,४00 रुपये किलो झाली.
जागतिक बाजारातही सोने तेजीत असल्याचे दिसून आले. लंडनमधील बाजारात सोने 0.0७ टक्क्याने वाढून १,३३९.५0 डॉलर, तर चांदी 0.६६ टक्क्याने वाढून १९ डॉलर प्रति औंस झाली.
दिल्लीच्या सराफा बाजारात ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी
१५0 रुपयांनी वाढून अनुक्रमे
३१,२00 रुपये आणि ३१,0५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. काल सोने
२00 रुपयांनी उतरले होते. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव १00 रुपयांनी वाढून २४,३00 रुपये राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोने-चांदी पुन्हा तेजाळले
ज्वेलर्सनी जोरदार खरेदी केल्यामुळे राजधानी दिल्लीत सोने १५0 रुपयांनी वाढून ३१,२00 रुपये तोळा झाले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2016 04:40 AM2016-08-24T04:40:56+5:302016-08-24T04:40:56+5:30