Join us  

सोने-चांदी पुन्हा तेजाळले

By admin | Published: July 12, 2016 12:15 AM

जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोने १५0 रुपयांनी वाढून ३0,८५0 रुपये तोळा झाले. त्याचप्रमाणे चांदी ४३0 रुपयांनी वाढून ४६,७३0 रुपये किलो झाली.

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोने १५0 रुपयांनी वाढून ३0,८५0 रुपये तोळा झाले. त्याचप्रमाणे चांदी ४३0 रुपयांनी वाढून ४६,७३0 रुपये किलो झाली. सिंगापूर येथील बाजारात सोन्याचा भाव वाढून १,३६५.४१ डॉलर प्रति औंस झाला आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसून आला, असे जाणकारांनी सांगितले. ज्वेलरांनी केलेल्या खरेदीचा लाभही मौल्यवान धातूंना मिळाला. दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १५0 रुपयांनी वाढून अनुक्रमे ३0,८५0 रुपये आणि ३0,७00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. गेल्या तीन दिवसांत सोने ३५0 रुपयांनी उतरले होते.