मुंबई - मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त असून, सोने ६१ तर चांदीचा भाव ७३ हजारांच्या आसपास आहे. लग्नाच्या मुहूर्तांमुळे सराफ बाजारांमध्ये गर्दी असून, यात भरच पडत आहे. दुसरीकडे मुंबईतील बँकांमध्ये लॉकरचे शॉर्टेज असून, लॉकरसाठी कमीत कमी ३०० ते ३५० रुपये एवढी रक्कम आकारली जात आहे. त्या व्यतिरिक्त बँकांकडे कमी जागा असून, बँका डिजिटल झाल्या आहेत.
बँकेमधील लॉकर्सचा वापर सोने-चांदी ठेवण्यासाठी केला जातो. लॉकर्सचे दर बँका ठरवितात. प्रत्येक बँकेचे दर वेगळे असतात. लॉकर्सचा कमीत कमी दर हा ३०० ते ३५० रुपये असा असतो. दर सहा महिन्यांनी हे दर आकारले जातात. - विश्वास उटगी, बँकिंग तज्ज्ञ
मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे सोने-चांदीला मागणी आहे. सोने ६१ हजार तर चांदी ७३ हजार असा भाव सुरू आहे. सध्या एवढे काम आहे की कारागीर कमी पडत आहेत. आता महिनाभर हेच चित्र राहील. - कुमार जैन, अध्यक्ष, मुंबई ज्वेलर्स असोसिएशन
दक्षिण मुंबईतल्या बाजारपेठांत ज्या बँका आहेत; त्या बँकेत मात्र लॉकर सिस्टीम सुरू आहे. कारण त्या बँका जुन्या आहेत. त्यांच्या लॉकरसाठी जागा आहेत. बँकांमध्ये लॉकर्ससाठी वेटिंग काही वर्षांपूर्वी बँकांकडे मोठ्या जागा होत्या. त्यामुळे लॉकरनांही जागा मिळत होती. मात्र, आता जागा कमी आहेत. बँका लहान आहेत. त्यामुळे लॉकर सिस्टीम तशी मोडीत निघाली आहे. मात्र, तरीही मुंबईत लॉकरचे शॉर्टेज आहे. बँका डिजिटल झाल्या आता स्पर्धेचे युग आहे. पूर्वी बँकेबाहेर लॉकर्स उपलब्ध आहेत, अशी पाटी लागायची. मात्र आता सगळे डिजिटल झाले आहे. एटीएम कुठेही उपलब्ध आहेत. बँकेच्या जागा लहान आहेत. त्यामुळे लॉकर्सचा वापर फार कमी बँकांकडून केला जातो.