जळगाव : चार दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात दररोज घसरण होत असून, सोने एक हजार ५० रुपये, तर चांदी चार हजार ५०० रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे सोने ५८ हजार ७५० रुपये प्रति तोळा, तर चांदी ६९ हजार रुपये प्रति किलोवर आली. गेल्या तीन महिन्यांतील हे नीचांकीचे भाव आहेत.
फेब्रुवारी महिन्यापासून सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ होत जाऊन नवनवीन उच्चांक गाठले. मात्र, जून महिन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव कमी-कमी होत गेले. त्यात १९ जूनपासून तर दररोज भावात घसरण होत आहे. सातत्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी घटत असल्याने सोने-चांदीच्या भावात घसरण होत असल्याचे सांगण्यात येत आहे.