Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्या-चांदीच्या भावाला झळाळी

सोन्या-चांदीच्या भावाला झळाळी

दिवाळीच्या मोठ्या सणाने अखेर शुक्रवारी सोने आणि चांदीच्या भावातील घसरण रोखून काहीशी चमक निर्माण केली. १० ग्रॅममागे सोने ८० रुपयांनी वधारून २६,३३० रुपयांवर

By admin | Published: November 7, 2015 02:44 AM2015-11-07T02:44:52+5:302015-11-07T02:44:52+5:30

दिवाळीच्या मोठ्या सणाने अखेर शुक्रवारी सोने आणि चांदीच्या भावातील घसरण रोखून काहीशी चमक निर्माण केली. १० ग्रॅममागे सोने ८० रुपयांनी वधारून २६,३३० रुपयांवर

The gold and silver brochure is bright | सोन्या-चांदीच्या भावाला झळाळी

सोन्या-चांदीच्या भावाला झळाळी

नवी दिल्ली : दिवाळीच्या मोठ्या सणाने अखेर शुक्रवारी सोने आणि चांदीच्या भावातील घसरण रोखून काहीशी चमक निर्माण केली. १० ग्रॅममागे सोने ८० रुपयांनी वधारून २६,३३० रुपयांवर, तर चांदी किलोमागे ५० रुपयांनी महाग होऊन ३५,८०० रुपयांवर गेली.
या दोन्ही धातूंना जागतिक बाजारात आणि देशात दागिने निर्मात्यांकडून मागणी वाढल्याचा हा सकारात्मक परिणाम आहे. सिंगापूरच्या बाजारातील भावावरच देशातील सोन्याचे भाव बहुतेक वेळा ठरतात. तेथे सोन्याचा भाव औंसमागे ०.५ टक्क्यांनी वधारून १,१०९.३६ अमेरिकन डॉलर झाला. न्यूयॉर्कमध्ये गुरुवारी सोने औंसमागे ०.३५ टक्क्यांनी स्वस्त होऊन १,१०३.६० अमेरिकन डॉलर झाले होते. दिल्लीमध्ये ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धतेचे सोने अनुक्रमे २६,३३० व २६,१८० रुपये झाले. गेल्या सात सत्रांमध्ये सोने तब्बल १,०१५ रुपयांनी स्वस्त झाले होते. आठ ग्रॅम सोन्याचे नाणे मात्र मर्यादित व्यवहारात २२,३०० रुपयांवर स्थिर राहिले.

Web Title: The gold and silver brochure is bright

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.