Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने-चांदीच्या नाण्यांना दागिन्यांपेक्षा चांगली मागणी

सोने-चांदीच्या नाण्यांना दागिन्यांपेक्षा चांगली मागणी

शुभ दिन धनत्रयोदशीच्या दिवशी सोमवारी अशोक चक्राचे चिन्ह असलेल्या सोन्याच्या नाण्यांसह चांदीच्या नाण्यांना मोठी मागणी होती.

By admin | Published: November 9, 2015 10:07 PM2015-11-09T22:07:32+5:302015-11-09T22:07:32+5:30

शुभ दिन धनत्रयोदशीच्या दिवशी सोमवारी अशोक चक्राचे चिन्ह असलेल्या सोन्याच्या नाण्यांसह चांदीच्या नाण्यांना मोठी मागणी होती.

Gold and silver coins are better off than jewelery | सोने-चांदीच्या नाण्यांना दागिन्यांपेक्षा चांगली मागणी

सोने-चांदीच्या नाण्यांना दागिन्यांपेक्षा चांगली मागणी

मुंबई : शुभ दिन धनत्रयोदशीच्या दिवशी सोमवारी अशोक चक्राचे चिन्ह असलेल्या सोन्याच्या नाण्यांसह चांदीच्या नाण्यांना मोठी मागणी होती. सोन्याच्या कमी झालेल्या किमतीमुळे लोकांनी दागिन्यांऐवजी नाणे खरेदीला प्राधान्य दिले.
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी ही शुभ (विशेषत: पश्चिम व उत्तर भारतात) मानली जाते. सराफा व्यापाऱ्यांनी व एमएमटीसी-पीएएमपीने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात खरेदी चांगली झाली.
एमएमटीसी-पीएएमपीचे अध्यक्ष (विपणन) विपीन रैना म्हणाले की,‘‘सरकार शुभ असल्यामुळे खरेदी केली जात आहे. दागिन्यांऐवजी नाण्यांना चांगली मागणी आहे. गेल्या वर्षीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी जेवढी सोन्याच्या नाण्यांना मागणी होती ती यंदा २५ टक्क्यांनी वाढण्याची आशा आहे.
चांदीच्या नाण्यांची विक्री तर दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. अशोकचक्र असलेल्या सोन्याच्या नाण्याला जास्त मागणी आहे. देशातील एमएमटीसीच्या १२५ केंद्रांवर या नाण्याची विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे.’’
सोने १२०, तर चांदी ११० रुपयांनी वधारली
नवी दिल्ली : ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर सोन्याच्या भावाला काही का असेना झळाळी मिळाली. धनत्रयोदशीच्या दिवशी सोमवारी सोने १० ग्रॅममागे १२० रुपयांनी वधारून २६,२३० रुपये झाले. दागिने निर्मात्यांकडून आलेली आणि विदेशात वाढलेली मागणी व्यापाऱ्यांना दिलासा देऊन गेली, तसेच डॉलर एक रुपयाने स्वस्त झाल्यामुळे आयात महागली त्यामुळेही सोन्याचे भाव वाढले.
सोन्याचाच कित्ता चांदीनेही गिरवत किलोमागे ११० रुपये महाग होऊन ३५,४१० रुपये झाली. चांदीला औद्योगिक क्षेत्रातून आणि नाणे निर्मात्यांकडून मागणी वाढल्याचा हा परिणाम होता.
शनिवारच्या व्यवहारात सोने २२० रुपयांनी घसरले होते. आठ ग्रॅ्रमचे सुवर्ण नाणे ५० रुपयांनी महाग होऊन २२,३०० रुपयांवर गेले. फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये फेब्रुवारीतील डिलिव्हरीसाठी १७१ रुपये (०.६६) सोने महाग होऊन २५,८६५ रुपये झाले. वीकली बेस्ड् डिलिव्हरीची चांदी किलोमागे २४० रुपयांनी महाग होऊन ३५,१४० रुपयांवर गेली. चांदीच्या १०० नाण्यांच्या भावात मात्र काहीही बदल न होता ते खरेदीसाठी ४९ हजार व विक्रीसाठी ५० हजार रुपये असे स्थिर राहिले.

Web Title: Gold and silver coins are better off than jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.