Join us

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सोन्याचांदीची नाणी; सरकारी, खासगी कंपन्यांच्या नाणेविक्रीला उत्तम प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 5:33 AM

Independence Day :  प्रख्यात नाणेतज्ज्ञ सुधीर लुणावत यांनी सांगितले की, नाण्यांच्या इतिहासात या नाण्यांना खास महत्त्व असणार आहे. 

नवी दिल्ली :  स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमित्त काही सरकारी व खासगी कंपन्यांनी सोने, चांदीची विशेष नाणी जारी केली आहेत. केंद्र सरकारच्या एमएमटीसी कंपनीने १० ग्रॅम सोन्याचे तसेच ३१ ग्रॅम व ५० ग्रॅम शुद्ध चांदीची विशेष नाणी जारी केली आहेत. त्यांच्या विक्रीला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. प्रख्यात नाणेतज्ज्ञ सुधीर लुणावत यांनी सांगितले की, नाण्यांच्या इतिहासात या नाण्यांना खास महत्त्व असणार आहे. 

शुद्ध घडणावळ आणि प्रत्येकी वजन ७.५ ग्रॅम खासगी क्षेत्रातील ऑगमोंट या कंपनीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७.५ ग्रॅमचे सोन्याचे व ७.५ ग्रॅमचे शुद्ध चांदीचे नाणे विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. ऑगमोंट कंपनीने सोन्याच्या नाण्याची निर्मिती केंद्र सरकारच्या मुंबई टाकसाळीत केली आहे. हैदराबादमधील ओमकार मिंट या खासगी कंपनीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २० ग्रॅम शुद्ध चांदीचे नाणे बनविले आहे. 

नाण्यावर दांडी यात्रेचे चित्रस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एमएमटीसी या सरकारी कंपनीने जारी केलेल्या नाण्यांवर  महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेचे चित्र आहे. तसेच निळ्या रंगाच्या अशोक स्तंभाच्या दोन्ही बाजूंना तिरंगा ध्वज दाखविले आहेत. हे चित्र अतिशय आकर्षक आहे.

टॅग्स :स्वातंत्र्य दिनसोनंचांदी