नवी दिल्ली : येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी संपूर्ण देशभर सुरू आहे. त्यात प्रभू श्रीराम-सीता तसेच राम मंदिराची प्रतिमा असलेले सोने आणि चांदीच्या नाण्यांना जोरदार मागणी वाढलेली दिसत आहे. उत्तर प्रदेशात या नाण्यांना सर्वाधिक मागणी आहे.
बाजारात सध्या २५ हजारांपासून २ लाखापर्यंतच्या किमतीची राम-सीता आणि राम मंदिराची प्रतिमा असलेली नाणी बनवण्यावर भर दिला जात आहे, असे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. १० ग्रॅम चांदीच्या नाण्याची किंमत ८५० रुपयांपर्यंत आहे. नागरिक ही नाणी घरी देवघरात ठेवण्यासाठी तसेच जवळच्या मित्र परिवारातील व्यक्तींना भेट म्हणून देण्यासाठी खरेदी करताना दिसत आहेत.
२२ जानेवारी रोजी अशी नाणी खरेदी करणाऱ्यांना खास सूट दिली जाणार आहे. प्राणप्रतिष्ठेचा दिवस जवळ येत असल्याने व्यापाऱ्यांनी अशी नाणी उपलब्ध करून देण्याची सज्जता केली आहे. घरावर फडकवण्यासाठी भगवे ध्वज घेतले जात आहेत. मंकरसंक्रातीनिमित्त प्रभूरामाचे चित्र असलेल्या पतंगांना मागणी होती.