Join us

सोने-चांदी उतरले

By admin | Published: January 19, 2016 3:09 AM

सोमवारी सोन्या-चांदीचा भाव घसरला. सोने १६५ रुपयांनी उतरून २६,३८५ रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदीचा भाव १५ रुपयांनी उतरून ३४,000 रुपये किलो झाली.

नवी दिल्ली : सोमवारी सोन्या-चांदीचा भाव घसरला. सोने १६५ रुपयांनी उतरून २६,३८५ रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदीचा भाव १५ रुपयांनी उतरून ३४,000 रुपये किलो झाली. बाजारातील सूत्रांनी सांगितले की, रिटेलर्स आणि ज्वेलरांकडून असलेल्या मागणीत झालेली घट सोन्याच्या घसरणीस प्रामुख्याने कारणीभूत आहे. चांदीच्या भावातील घसरण ही प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्राकडील तसेच शिक्के निर्मात्यांकडील मागणी कमी झाल्यामुळे झाली.जागतिक बाजारातील घसरणही मौल्यवान धातूंचे भाव खाली घेऊन आली. सिंगापुरात सोने 0.४ टक्क्यांनी घसरून १,0९३.४६ डॉलर प्रति औंस झाले. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १६५ रुपयांनी उतरून अनुक्रमे २६,३८५ रुपये आणि २६,२३५ रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. शनिवारी सोने ३४0 रुपयांनी वाढले होते. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव १00 रुपयांनी उतरून २२,३00 रुपये झाला.