Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने-चांदी तेजीतच!

सोने-चांदी तेजीतच!

जागतिक बाजारातील तेजी आणि स्थानिक बाजारातील खरेदीचा जोर या बळावर बुधवारी सोन्याचा भाव ४५ रुपयांनी वाढून ३0,९३५ रुपये तोळा झाला. तसेच चांदी १३0 रुपयांनी वाढून ४६,९00 रुपये किलो झाली

By admin | Published: July 14, 2016 03:35 AM2016-07-14T03:35:38+5:302016-07-14T03:35:38+5:30

जागतिक बाजारातील तेजी आणि स्थानिक बाजारातील खरेदीचा जोर या बळावर बुधवारी सोन्याचा भाव ४५ रुपयांनी वाढून ३0,९३५ रुपये तोळा झाला. तसेच चांदी १३0 रुपयांनी वाढून ४६,९00 रुपये किलो झाली

Gold and silver fast! | सोने-चांदी तेजीतच!

सोने-चांदी तेजीतच!

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील तेजी आणि स्थानिक बाजारातील खरेदीचा जोर या बळावर बुधवारी सोन्याचा भाव ४५ रुपयांनी वाढून ३0,९३५ रुपये तोळा झाला. तसेच चांदी १३0 रुपयांनी वाढून ४६,९00 रुपये किलो झाली. सोन्याचा भाव सलग तिसऱ्या दिवशी तर चांदी सलग चौथ्या दिवशी तेजीत राहिली.
सिंगापूरमध्ये सोने 0.७ टक्क्यांनी वाढून १,३४१.७१ डॉलर प्रति औंस झाले.दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के सोन्याचा भाव प्रत्येकी ४५ रुपयांनी वाढून अनुक्रमे ३0,९३५ रुपये आणि ३0,७८५ रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. सोन्याच्या गिन्नीचा भाव वाढून २३,५00 रुपये झाला. तयार चांदीचा भाव १३0 रुपयांनी वाढून ४६,९00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव मात्र १५ रुपयांनी घसरून ४७,८९0 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ७४ हजार रुपये आणि विक्रीसाठी ७५ हजार रुपये असा स्थिर राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Gold and silver fast!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.