Lokmat Money > बिझनेस न्यूज > किरकोळ व्यापाऱ्यांच्या खरेदीने सोने-चांदी तेजीत

किरकोळ व्यापाऱ्यांच्या खरेदीने सोने-चांदी तेजीत

चार दिवसांच्या मंदीला हुसकावून लावीत सोने आणि चांदीने घालविलेली चमक पुन्हा मिळविली. जागतिक बाजारातील तेजी आणि दागदागिने

By admin | Published: August 7, 2015 10:01 PM2015-08-07T22:01:02+5:302015-08-07T22:01:02+5:30

चार दिवसांच्या मंदीला हुसकावून लावीत सोने आणि चांदीने घालविलेली चमक पुन्हा मिळविली. जागतिक बाजारातील तेजी आणि दागदागिने

Gold and Silver gained sharply by buying from retailers | किरकोळ व्यापाऱ्यांच्या खरेदीने सोने-चांदी तेजीत

किरकोळ व्यापाऱ्यांच्या खरेदीने सोने-चांदी तेजीत

नवी दिल्ली : चार दिवसांच्या मंदीला हुसकावून लावीत सोने आणि चांदीने घालविलेली चमक पुन्हा मिळविली. जागतिक बाजारातील तेजी आणि दागदागिने तयार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी खरेदी केल्याने दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी तेजी परतली.
दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव १९० रुपयांनी वधारत २५,१७० रुपयांवर (प्रति दहा ग्रॅम) गेला, तर चांदीचा भाव ३३० रुपयांनी वाढत ३४,१३० रुपयांवर (प्रति किलो) गेला.
लंडनमध्ये सोन्याचा भाव ०.२३ टक्क्यांनी वधारत १०९२ डॉलरवर, तर चांदीचा भाव ०.८२ टक्क्यांनी वाढत १४.७७ डॉलरवर (प्रति औंस) होता.
औद्योगिक क्षेत्र आणि नाणे तयार करणाऱ्यांनी खरेदी केल्याने चांदीला झळाळी मिळाली. जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे किरकोळ व्यापाऱ्यांनी खरेदी केल्याने सोने तेजीत आले.

Web Title: Gold and Silver gained sharply by buying from retailers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.