नवी दिल्ली : चार दिवसांच्या घसरणीनंतर जागतिक बाजारातील मजबूत स्थितीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने-चांदीचे भाव वधारले. सोन्याचा भाव २५५ रुपयांनी उंचावून २८,७३० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांकडून चांगली मागणी आल्याने चांदीचा भावही ५०० रुपयांची झेप घेत ४५,३०० रुपये प्रतिकिलो झाला.
बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारातील मजबूत स्थितीने व्यापारी व साठेबाजांच्या धारणेवर परिणाम झाला. जागतिक बाजारात या मौल्यवान धातूंनी तीन महिन्यांचा उच्चांक गाठला.
न्यूयॉर्क बाजारात सोन्याचा भाव ०.९० टक्क्यांनी वाढून १,३२.९० डॉलर प्रतिऔंस झाला. चांदीचा भावही ०.४३ टक्क्यांनी उंचावून २०.९६ डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोने-चांदीच्या भावात सुधारणा
चार दिवसांच्या घसरणीनंतर जागतिक बाजारातील मजबूत स्थितीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने-चांदीचे भाव वधारले
By admin | Published: July 2, 2014 04:10 AM2014-07-02T04:10:06+5:302014-07-02T04:10:06+5:30