Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने-चांदीच्या बाजारात पुन्हा तेजी, सणा-सुदीच्या तोंडावर भाव वाढले

सोने-चांदीच्या बाजारात पुन्हा तेजी, सणा-सुदीच्या तोंडावर भाव वाढले

जागतिक बाजारातील तेजीनंतर देशातील सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. एमसीएक्सवर ऑक्टोबर महिन्यातील सोन्याच्या वायदा बाजारात 0.18 टक्क्यांची वाढ झाली असून सोने प्रतितोळा 53,370 रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 11:11 AM2020-08-18T11:11:40+5:302020-08-18T11:12:42+5:30

जागतिक बाजारातील तेजीनंतर देशातील सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. एमसीएक्सवर ऑक्टोबर महिन्यातील सोन्याच्या वायदा बाजारात 0.18 टक्क्यांची वाढ झाली असून सोने प्रतितोळा 53,370 रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

Gold and silver markets rebounded on the eve of the festive season | सोने-चांदीच्या बाजारात पुन्हा तेजी, सणा-सुदीच्या तोंडावर भाव वाढले

सोने-चांदीच्या बाजारात पुन्हा तेजी, सणा-सुदीच्या तोंडावर भाव वाढले

Highlightsजागतिक बाजारातील तेजीनंतर देशातील सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. एमसीएक्सवर ऑक्टोबर महिन्यातील सोन्याच्या वायदा बाजारात 0.18 टक्क्यांची वाढ झाली असून सोने प्रतितोळा 53,370 रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

मुंबई - कोरोनाच्या संकटात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढून भावही वाढलेल्या सोने चांदीच्या भावात कोरोनाच्या लसीची घोषणा होताच मोठी घसरण झाली होती. रशियाने लसीचा दावा करताच सट्टा बाजारातील खरेदीदारांनी विक्रीचा मारा सुरू केला व आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण बाजार गडगडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे बुधवार, १२ ऑगस्ट रोजी चांदीत एकाच दिवसात तब्बल बारा हजार रुपये तर सोन्यात चार हजार रुपयांनी घसरण झाली. मात्र, सणा-सुदीच्या काळात आता पुन्हा सोने-चांदीच्या वायदा बाजारात तेजी आल्याचं पाहायला मिळत आहे. सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं दिसून येतंय. 

जागतिक बाजारातील तेजीनंतर देशातील सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. एमसीएक्सवर ऑक्टोबर महिन्यातील सोन्याच्या वायदा बाजारात 0.18 टक्क्यांची वाढ झाली असून सोने प्रतितोळा 53,370 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तर, चांदीच्या वायदा बाजारात 0.8 टक्क्यांची वाढ होऊन 69,888 रुपये प्रति किलो झाली आहे. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पहिल्या आठवड्यात सोन्याचा दर 56,191 प्रति तोळा एवढा झाला होता. तर, गेल्या 4-5 दिवसांपूर्वी चांदी ७५ हजार ५०० रुपयांवरून थेट ६३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली तर सोने ५५,७०० रुपयांवरून ५१ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहे होते. गेल्या काही दिवसांपासून सट्टेबाजांमुळे अस्थिर झालेल्या सुवर्ण बाजारात याचे परिणाम दिसून येत आहेत. तर, सोने-चांदीच्या भावात अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत आहे.

रशियातील लसीच्या घोषणेनंतर विक्रीचा मारा कोरोनामुळे जागतिक पातळीवर आर्थिक मंदीचे सावट असल्याने सोने-चांदीच्या खरेदीकडे कल वाढला होता. त्या कोरोनाच्या लसीची रशियाने घोषणा करताच सट्टा बाजारात खरेदीदारांनी खरेदी थांबवून विक्रीचा मारा सुरू केला आहे. त्यामुळे ७५ हजार ५०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात १२ हजार रुपयांनी घसरण होऊन ती बुधवारी ६३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली. अशाच प्रकारे मंगळवारी ५५ हजार ७०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात चार हजार रुपयांनी घसरण होऊन ते ५१ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर आले होते. मात्र, आता पुन्हा सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. 
 

Web Title: Gold and silver markets rebounded on the eve of the festive season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.