Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने-चांदी पुन्हा एकदा उसळले

सोने-चांदी पुन्हा एकदा उसळले

दोन दिवसांच्या घसरणीचा कल संपला असून सराफा बाजारात पुन्हा एकदा तेजी परतली आहे. राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा

By admin | Published: July 10, 2015 12:58 AM2015-07-10T00:58:04+5:302015-07-10T00:58:04+5:30

दोन दिवसांच्या घसरणीचा कल संपला असून सराफा बाजारात पुन्हा एकदा तेजी परतली आहे. राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा

Gold and silver once again | सोने-चांदी पुन्हा एकदा उसळले

सोने-चांदी पुन्हा एकदा उसळले

नवी दिल्ली : दोन दिवसांच्या घसरणीचा कल संपला असून सराफा बाजारात पुन्हा एकदा तेजी परतली आहे. राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा भाव २00 रुपयांनी वाढून २६,३७0 रुपये तोळा झाला. चांदी १,0५0 रुपयांनी वाढून ३५,५00 रुपये किलो झाली.
गेल्या दोन दिवसांत सोन्याचा भाव ४00 रुपयांनी घसरला होता. कालच्या घसरणीनंतर सोने तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेले होते. आज मात्र बाजाराची धारणा सुधारली. डॉलरची किंमत घसरल्यामुळे मौल्यवान धातूंचा भाव वाढला. त्याबरोबरच सोन्याची मागणीही वाढली. भारतातील सराफा बाजारातील भाव ठरविणाऱ्या सिंगापुरातील बाजारात सोन्याचा भाव 0.७ टक्क्यांनी वाढून १,१६६.६९ डॉलर प्रति औंस झाला. चांदी १.५ टक्क्यांनी वाढून १५.३९ डॉलर प्रति औंस झाली.
तयार चांदीचा भाव १,0५0 रुपयांनी वाढून ३५,५00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव १,१२0 रुपयांनी वाढून ३५,२८0 रुपये किलो झाला. दरम्यान, चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५३ हजार रुपये आणि विक्रीसाठी ५४ हजार रुपये प्रति शेकडा असा आदल्या दिवशीच्या पातळीवर स्थिर राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Gold and silver once again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.