Join us

मागणी घटल्यामुळे सोने-चांदी घसरले

By admin | Published: September 27, 2016 2:36 AM

मागणीत मोठी घट झाल्यामुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोने ८0 रुपयांनी घसरून ३१,५२0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदीही १५0 रुपयांनी घसरून ४६,३५0 रुपये किलो झाली.

नवी दिल्ली : मागणीत मोठी घट झाल्यामुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोने ८0 रुपयांनी घसरून ३१,५२0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदीही १५0 रुपयांनी घसरून ४६,३५0 रुपये किलो झाली.जागतिक बाजारांतही सोने उतरले. तर दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के सोन्याचा भाव प्रत्येकी ८0 रुपयांनी उतरून ३१,५२0 रुपये आणि ३१,३७0 रुपये प्रति तोळा झाला. शनिवारी सोने ८0 रुपयांनी वाढले होते. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २४,५00 रुपये असा स्थिर राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)