Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने-चांदी सलग दुसऱ्या दिवशी घसरले

सोने-चांदी सलग दुसऱ्या दिवशी घसरले

सोन्याच्या भावात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. १0 रुपयांनी घसरलेले सोने २९,0३0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले.

By admin | Published: June 8, 2016 04:06 AM2016-06-08T04:06:53+5:302016-06-08T04:06:53+5:30

सोन्याच्या भावात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. १0 रुपयांनी घसरलेले सोने २९,0३0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले.

Gold and silver plummeted for the second consecutive day | सोने-चांदी सलग दुसऱ्या दिवशी घसरले

सोने-चांदी सलग दुसऱ्या दिवशी घसरले


नवी दिल्ली : सोन्याच्या भावात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. १0 रुपयांनी घसरलेले सोने २९,0३0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदीही ५0 रुपयांनी घसरून ३९,१५0 रुपये किलो झाली.
दागिने निर्माते आणि ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्याने बाजारात घसरण झाली. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १0 रुपयांनी घसरून अनुक्रमे २९,0३0 रुपये आणि २८,८८0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. काल सोने १८५ रुपयांनी घसरले होते. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २२,९00 रुपये असा स्थिर राहिला. दिल्लीत तयार चांदीचा भाव ५0 रुपयांनी घसरून ३९,१५0 रुपये किलो झाला.

Web Title: Gold and silver plummeted for the second consecutive day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.