Gold rate today 21 January 2021 : जागतिक बाजारात सेन्सेन्सने भरारी घेतल्यानंतर आता सोन्याचे दरही वाढू लागले आहेत. जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दरानं चांगली उचल घेतली आहे. गेल्या चार दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
बजेट २०२१: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; 'या' वस्तूंच्या किंमती वाढणार?
मुंबईत २२ कॅरेट सोन्यामध्ये प्रति १० ग्रॅम (१ तोळं) सोन्याचा भाव ४८,११० रुपयांवर पोहोचला आहे. good returns या वेबसाईटनुसार काल (बुधवारी) मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८,०१० रुपये इतका होता. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९,०१० रुपये इतका होता. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७,८१० रुपये होता. २४ कॅरेटसाठी तो ५२,१६० रुपये होता.
बायडेन धमका! शेअर बाजारात मोठी उसळी; पहिल्यांदाच ५० हजार पार
अमेरिकेत झालेल्या राजकीय घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरावरही झाल्याचं पाहायला मिळत आहे. जो बायडन हे अमेरिकेचे ४६ वे राष्ट्रपतीपती विराजमान झाल्यानंतर अमेरिकेच्या बाजारपेठेत चांगली तेजी पाहायला मिळाली. जागतिक बाजारपेठेप्रमाणेच देशांतर्गत बाजारातही वाढ झाली आणि यावेळी सेन्सेक्स पहिल्यांदाच ५० हजारांवर पोहोचला. तर निफ्टीने १४,७०० च्या पुढे मजल मारली. याचाच परिणाम सोने आणि चांदीच्या दरावरही झाल्याचं पाहायला मिळत आहे.