Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्या-चांदीच्या भावात घसरण

सोन्या-चांदीच्या भावात घसरण

जागतिक बाजारातील नरमाई आणि देशांतर्गत बाजारात घटलेली मागणी यामुळे सोन्याचा भाव शुक्रवारी ८५ रुपयांनी घसरून २७,२00 रुपये तोळा झाला.

By admin | Published: February 21, 2015 02:40 AM2015-02-21T02:40:55+5:302015-02-21T02:40:55+5:30

जागतिक बाजारातील नरमाई आणि देशांतर्गत बाजारात घटलेली मागणी यामुळे सोन्याचा भाव शुक्रवारी ८५ रुपयांनी घसरून २७,२00 रुपये तोळा झाला.

Gold and silver prices fell | सोन्या-चांदीच्या भावात घसरण

सोन्या-चांदीच्या भावात घसरण

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील नरमाई आणि देशांतर्गत बाजारात घटलेली मागणी यामुळे सोन्याचा भाव शुक्रवारी ८५ रुपयांनी घसरून २७,२00 रुपये तोळा झाला. त्याचबरोबर चांदीचा भाव २00 रुपयांनी घसरून ३७,२00 रुपये झाले.
भावाचा कल ठरविणाऱ्या न्यूयॉर्क येथील बाजारात सोन्याचा भाव 0.५0 टक्क्यांनी घसरून १,२0७.२0 डॉलर प्रति औंस झाला. चांदीचा भाव 0.७३ टक्क्यांनी घसरून १६.३८ डॉलर प्रति औंस झाला.
न्यूयॉर्क बाजारातील घसरणीचा थेट फटका भारतीय बाजारास बसला. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के शुद्धता आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव ८५ रुपयांनी घसरून अनुक्रमे २७,२00 रुपये आणि २७,000 रुपये तोळा झाला. काल सोन्याच्या भावात ९५ रुपयांची वाढ झाली होती. सोन्याच्या आठ ग्रॅमच्या गिन्नीचा भाव मात्र आदल्या दिवशीच्या पातळीवर २३,७00 रुपये असा कायम राहिला. तयार चांदीचा भाव २00 रुपयांनी घसरून ३७,२00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीचा चांदीचा भाव २६0 रुपयांनी घसरून ३६,५६५ रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव मात्र आदल्या दिवशीच्या पातळीवर खरेदीसाठी ६0 हजार रुपये शेकडा आणि विक्रीसाठी ६१ हजार रुपये शेकडा असा कायम राहिला. औद्योगिक क्षेत्राकडून तसेच शिक्के निर्मात्यांकडून मागणीचे पाठबळ न मिळाल्याने चांदीला फटका बसला.

भारताची सोन्याची आयात फेब्रुवारी महिन्यात वाढून ३५-४० टन होऊ शकते. मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन (एमएमटीसी)-पँपने दिलेल्या माहितीनुसार हीच आयात २०१४ च्या फेब्रुवारीमध्ये २६ टन होती.
सार्वजनिक क्षेत्रातील एमएमटीसी-पँप हा भारत आणि स्वीत्झर्लंड सरकार यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. पँप ही सोन्यावर प्रक्रिया करणारी जगातील अत्याधुनिक व्यवस्था आहे.

Web Title: Gold and silver prices fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.