नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर आणि व्यापाऱ्यांची मागणी घटल्याने राजधानी दिल्लीच्या सराफ्यात गुरुवारी सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली. आज सोन्याचा भाव २०० रुपयांच्या घसरणीसह २७,००० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. चांदीचा भावही ३५० रुपयांनी घटून ३६,२५० रुपये प्रतिकिलो राहिला.
जागतिक बाजारात सोन्याच्या भावाने आठवडाभराचा नीचांक गाठला. परिणामी स्थानिक सराफ्यातही नकारात्मक बाजार धारणा राहिली. सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.२ टक्क्यांनी घटून १,१८४.४५ डॉलर प्रतिऔंस झाला. गेल्या १४ एप्रिलचा हा नीचांक आहे. सोन्याप्रमाणेच तयार चांदीचा भावही ३५० रुपयांच्या घसरणीसह ३६,२५० रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव २४५ रुपयांनी कमी होऊन ३५,९४० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५५,००० रुपये व विक्रीकरिता ५६,००० रुपये प्रतिशेकड्यावर राहिला.
सोन्या-चांदीच्या भावात घसरण
जागतिक बाजारातील कमजोर आणि व्यापाऱ्यांची मागणी घटल्याने राजधानी दिल्लीच्या सराफ्यात गुरुवारी सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली.
By admin | Published: April 23, 2015 11:18 PM2015-04-23T23:18:17+5:302015-04-23T23:18:17+5:30