नवी दिल्ली : येथील सराफा बाजारात सोमवारी सोने ३0 रुपयांनी उतरून ३0,९00 रुपये तोळा, तर चांदी ५0 रुपयांनी उतरून ४६,२५0 रुपये किलो झाली. जागतिक बाजारातही सोने घसरले. सिंगापुरात सोने 0.३ टक्क्यांनी घसरून १,३३१.५९ डॉलर प्रति औंस झाले. २९ जुलैनंतरची ही नीचांकी पातळी ठरली.
राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के सोन्याचा
भाव प्रत्येकी ३0 रुपयांनी घसरून अनुक्रमे ३0,९00 रुपये आणि ३0,७00 रुपये झाला. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २४,२00 रुपये असा स्थिर राहिला. शनिवारी
सोने १७0 रुपयांनी घसरले होते. दिल्लीत तयार चांदी ५0 रुपयांनी उतरून ४६,२५0 रुपये किलो, तर साप्ताहिक डिलिव्हरीची चांदी २९0 रुपयांनी उतरून ४५,९३५ रुपये किलो झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्या-चांदीच्या भावात घसरण
येथील सराफा बाजारात सोमवारी सोने ३0 रुपयांनी उतरून ३0,९00 रुपये तोळा, तर चांदी ५0 रुपयांनी उतरून ४६,२५0 रुपये किलो झाली.
By admin | Published: August 9, 2016 03:34 AM2016-08-09T03:34:00+5:302016-08-09T03:34:00+5:30