नवी दिल्ली : जागतिक बाजारातील नरमाईच्या कलाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा भाव ५0 रुपयांनी उतरून २९,७५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. चांदी ५00 रुपयांनी उतरून ३९,९५0 रुपये किलो झाली.
औद्योगिक क्षेत्र तसेच शिक्के निर्मात्यांकडून असलेली मागणी घटल्याचा फटका चांदीला बसला. फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे जागतिक बाजारात सोने ३ आठवड्यांच्या नीचांकावर गेले आहे. सिंगापूर बाजारात सोने 0.0७ टक्के घसरून १,२५३.८0 डॉलर प्रति औंस झाले. काल ते १,२४३.९0 डॉलरपर्यंत घसरले होते. २८ एप्रिलनंतरचा हा नीचांक ठरला होता. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ५0 रुपयांनी घसरून अनुक्रमे २९,७५0 रुपये व २९,६00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव मात्र २३,२00 रुपये असा आदल्या दिवशीच्या पातळीवर कायम राहिला. सोन्याप्रमाणेच तयार चांदीचा भाव ५00 रुपयांनी घसरून ३९,९५0 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ३00 रुपयांनी घसरून ३९,८७0 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव हजार रुपयांनी घसरून खरेदीसाठी ६७ हजार रुपये व विक्रीसाठी ६८ हजार रुपये प्रतिशेकडा झाला.
सोन्या-चांदीच्या भावात घसरण
राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा भाव ५0 रुपयांनी उतरून २९,७५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला.
By admin | Published: May 21, 2016 05:26 AM2016-05-21T05:26:25+5:302016-05-21T05:26:25+5:30