नवी दिल्ली : जागतिक बाजारातील नरमाई आणि ज्वेलरांनी खरेदीत घेतलेला आखडता हात यामुळे राजधानी दिल्लीत मंगळवारी सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली. औद्योगिक क्षेत्रातील मागणी कमी झाल्याचा फटकाही चांदीला बसला.जागतिक बाजारांपैकी प्रमुख बाजार असलेल्या सिंगापुरात सोन्याचा भाव 0.४५ टक्क्यांनी घसरून १,२४२.६0 डॉलर प्रति औंस झाला. चांदीचा भाव 0.६७ टक्क्यांनी घसरून १६.२४ डॉलर प्रति औंस झाला. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ८0 रुपयांनी उतरून अनुक्रमे २९,५७0 रुपये आणि २९,४२0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,१00 रुपये असा आदल्या दिवशीच्या पातळीवर कायम राहिला. दिल्लीत तयार चांदीचा भाव ८0 रुपयांनी उतरून ३९,५00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ६0 रुपयांनी उतरून ३९,४६५ रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ६७ हजार आणि विक्रीसाठी ६८ हजार रुपये प्रति शेकडा असा आदल्या दिवशीच्या पातळीवर कायम राहिला.
सोन्या-चांदीच्या भावात घसरण
By admin | Published: May 25, 2016 3:47 AM